किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलसोलापूर, ९ मार्च – अयोध्येत श्रीरामाची जगातील सर्वांत उंच आणि भव्य मूर्ती साकारण्यात येणार असल्याची माहिती मूर्तीकार अनिल राम सुतार यांनी दिली. ते आज मंगळवारी सोलापूर दौर्यावर आले असता एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
रामाची ही मूर्ती २५१ मीटर म्हणजेच ८२० फूट राहणार आहे. ती कांस्य धातूची असेल. मूर्तीचा चबुतरा ५१ मीटर उंचीचा, तर त्यावर रामाची २०० मीटर उंचीची मूर्ती असणार आहे, असे सुतार यांनी सांगितले. विशेष म्हणजे, सुतार यांच्याकडेच ही मूर्ती साकारण्याचे काम देण्यात आले आहे. सुमारे तीन हजार कारागिर व कामगारांचे मूर्तीच्या उभारणीत सहभागी असणार आहेत.
अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर सुमारे १३० एकर परिसरात ही मूर्ती साकारण्यात येणार आहे. या नदीकाठी निसर्गरम्य घाटाची निर्मिती करण्यात येणार आहे. या मूर्तीची उंची २५१ मीटर उंच असणार आहे. यापैकी ५० मीटरचा चबुतरा असेल व त्याच्यावर २०० मीटरची मूर्ती असणार आहे. या ५१ मीटर उंचीच्या चबुतर्यात १४ ते १५ मजले असणार आहेत. यात पर्यटकांना पूजेसाठी तसेच आध्यात्मिक अनुभूतीसाठी रामाचे मंदिर, ग्रंथालय, थिएटर, संग्रहाल, ऑडिटोरियम, रामायणाची शिल्पाकृती अशा वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश असणार आहे.
विमानतळासाठी २४२ कोटी मंजूर
नवी दिल्ली : अयोध्येतील विमानतळाचा विकास करण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने २४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती नागरी उड्डयण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली. या विमानतळावर अत्यावश्यक सेवा आणि सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून, देशविदेशातून येथे येणार्या भाविकांना त्याचा लाभ मिळणार आहे, असे टि्वट त्यांनी केले.