किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, ९ मार्च – चारचाकी वाहनांचा विमा काढण्यासाठी वाहनांवर फास्टॅग लावणे आवश्यक आहे. नवीन प्रणालीनुसार, फास्टॅगविना वाहनांचा विमा देखील दिला जाणार नाही. भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने या संदर्भात कठोर निर्णय घेतला आहे. ही नवीन प्रणाली १ एप्रिलपासून अंमलात येणार आहे. मंत्रालयाने फास्टॅगची सक्ती करीत याला विम्यासोबत जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विमा कंपन्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने चारचाकी वाहनांवर १५ फेब्रुवारीपासून फास्टॅग अनिवार्य केले आहे. १ एप्रिल २०२१ पासून चारचाकी वाहनांचा विमा काढण्यासाठी वाहनांवर फास्टॅग लावणे आवश्यक आहे. विमा काढताना कंपन्या वाहन क्रमांकाच्या आधारावर फास्टॅगचा लेसर कोड तपासणार आहेत. त्यामुळे वाहनाला फास्टॅग लावले आहे की नाही हे समजणार आहे.
वाहतूक सॉफ्टवेअरच्या मदतीने फास्टॅगची माहिती मिळू शकते. मंत्रालयाच्या अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, या नव्या प्रणालीतून ३१ मार्च २०२१ नंतर संपलेला विमा पुन्हा फास्टॅगसोबत येईल. अशाप्रकारे, हळूहळू विमा काढल्या गेलेल्या सर्व जुन्या वाहनांना फास्टॅग लागू होणार आहे. दरम्यान, मंत्रालयाने इतर अनेक सुविधा फास्टॅगशी जोडण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. सर्वांत आधी पार्किंगचे शुल्क फास्टॅगद्वारे घेण्याची योजना आहे. हैदराबाद विमानतळावर ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. तेथे पार्किंग शुल्क फास्टॅगद्वारे घेण्यात येत आहे.
हळूहळू ही सुविधा सर्व महानगरांना लागू होण्याची तयारी आहे, जेणेकरून लोकांना फास्टॅगसह अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जाऊ शकतात. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, भविष्यात पेट्रोल पंपावरचे पेमेंटही फास्टॅगद्वारे केले जाऊ शकते. सध्या २५ कोटींहून अधिक वाहनांना फास्टॅग लावण्यात आला आहे.