Posted by वृत्तभारती
Friday, August 25th, 2023
– प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, सोलापूर, (२५ ऑगस्ट) – माईंर्सं एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अद्वितीय संकल्पना, संरचना आणि नियोजनातून साकार झालेली माईंर्स एमआयटी पुणे ही संस्था तिच्या स्थापनेपासून गेली 40 वर्षे मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण पद्धतीचा प्रचार व प्रसार करून भारताची तरुण पिढी घडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. अशा या समूहाच्या माध्यमातून सोलापूर येथे एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाची सुरुवात येत्या 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र...
25 Aug 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, March 9th, 2021
सोलापूर, ९ मार्च – अयोध्येत श्रीरामाची जगातील सर्वांत उंच आणि भव्य मूर्ती साकारण्यात येणार असल्याची माहिती मूर्तीकार अनिल राम सुतार यांनी दिली. ते आज मंगळवारी सोलापूर दौर्यावर आले असता एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. रामाची ही मूर्ती २५१ मीटर म्हणजेच ८२० फूट राहणार आहे. ती कांस्य धातूची असेल. मूर्तीचा चबुतरा ५१ मीटर उंचीचा, तर त्यावर रामाची २०० मीटर उंचीची मूर्ती असणार आहे, असे सुतार यांनी सांगितले. विशेष म्हणजे, सुतार यांच्याकडेच ही...
9 Mar 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, March 22nd, 2016
सोलापूर, [२१ मार्च] – मोहोळ – सोलापूर जवळ एका वाहनाने वनवासी दिंडीतील २५ लोकांना चिरडले आहे. यात चौघांचा मृत्यू असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात आज सोमवारी पहाटे सोलापूर – मोहोळ रस्त्यावर बोडके फार्महाऊससमोर झाला आहे. मृत्युमुखी पडलेले सर्वजण वडाळा गावचे रहिवासी होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामायणानिमित्त काही दिवस वनवासात जाऊन राहण्याची परंपरा सोलापुरातील काही गावांमध्ये आहे. त्यानुसार हे २५ नागरिकांची दिंडी सोलापूर रस्त्याने वनवासात निघाले होते. मात्र...
22 Mar 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, January 31st, 2015
=मुंबई हायकोर्टाचा निकाल= मुंबई, [३० जानेवारी] – पंढरपुरात कायदा व सुरव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने माघी एकादशीनिमित्त आलेल्या वारकर्यांच्या मुक्कामासाठी चंद्रभागेच्या तीरावरच तात्पुरता निवारा बांधण्याची परवानगी प्रशासनाला दिली आहे. न्यायालयाने याच संदर्भातील आपला आधीचा निर्णय काही प्रमाणात शिथिल केल्याने वारकर्यांना दिलासा मिळाला आहे. आज शुक्रवारपासून दोन दिवस माघी एकादशीला सुरुवात झाली. यासाठी पंढरपुरात वारकरी मोठ्या संख्येत येत आहेत. या वारकर्यांनी चंद्रभागेच्या तीरावर राहुट्या उभारू नये, अशी...
31 Jan 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 10th, 2014
सोलापूर, [९ नोव्हेंबर] – हैदराबाद येथील खासदार असदुद्दिन ओवैसी यांचा एमआयएम हा देशद्रोही पक्ष असल्याची प्रखर टीका करणार्या कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना त्या पक्षाने कायदेशीर नोटीस बजावली आहे. आपण केलेल्या वक्तव्याबाबत आठ दिवसात जाहीर माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे एमआयएमच्या वकिलांनी प्रणिती शिंदे यांना पाठविलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. देशद्रोही, दहशतवादी आणि एमआयएम यांच्यात काहीच फरक नाही. त्यामुळे या पक्षावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी प्रणिती...
10 Nov 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, October 15th, 2014
सोलापूर, [१४ ऑक्टोबर] – सोलापूर येथील पंचायत समितीचे सदस्य व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते गुरूनाथ जगदेवप्पा कटारे यांचा सोमवारी रात्री साडेनऊ च्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून खून करण्यात आला. तर अन्य एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. मतदानाला आता केवळ काही तास उरले असतानाच हा प्रकार घडल्यामुळे राजकीय वादातून हा खून झाल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीसाठी कटारे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र नंतर माघार घेत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे...
15 Oct 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, September 7th, 2014
सोलापूर, [६ सप्टेंबर] – सोलापूर महानगर पालिकेच्या महापौरपदासाठी शनिवारी निवडणूक झाली. यावेळी कॉंग्रेसच्या प्रा. सुशिला आबुटे यांची महापौरपदासाठी निवड झाली. तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवीण डोंगरे यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत नगरसेविका आबुटे आणि भाजपाच्या नरसुबाई गदलवार यांच्या चुरस होती. गदलवार यांचा तीन मतांनी पराभव करीत आबुटे यांनी निवडणुकीत विजय मिळविला. तर प्रवीण डोंगरे यांच्याविरोधात शिवसेनेच्या मेनका चव्हाण निवडणुकीत उभ्या होत्या. प्रवीण डोंगरे यांनी चव्हाण यांचा पराभव केला....
7 Sep 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, August 7th, 2014
सोलापूर, [७ ऑगस्ट] – सोलापूरचा आनंद बनसोडे आता दक्षिण आफ्रिकेतील सव्र्वोच्च शिखर असलेले ‘किलीमांजारो’ वर शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी तिरंगा फडकवून भारताचे राष्ट्रगीत वाजविणार आहे. त्यानित्ताने शुक्रवार, ८ ऑगस्ट रोजी तो या मोहिमेवर रवाना होत असल्याची माहिती उद्योजक प्रमोद साठे, अभियंता राजेश जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. एव्हरेस्टवीर, एब्रुसवीर अशी ख्याती मिळविल्यानंतर अवघ्या क ाही दिवसातच किलीमांजारो सर करण्याची घोषणा आनंद बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. एकाच महिन्यात दोन...
7 Aug 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, August 6th, 2014
=‘मातोश्री’ वर झाला शिवसेना प्रवेश= सोलापूर, [६ ऑगस्ट] – अखेर सोलापूर महानगरपालिकेतील काँग्रेसचे पक्षनेते महेश कोठे यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज खांद्यावर घेत शिवबंधनाची बांधिलकी उध्दव ठाकरेंकडून बुधवारी घेतली. २५ माजी नगरसेवकांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत रिसतर प्रवेश केला. लवकरच सोलापुरात येऊन मेळावा घेऊ. शिवसेनेच्या कामाला लागा, असं उध्दव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शहरप्रमुख प्रताप चव्हाण, संपर्क प्रमुख पुरूषोत्तम बरडे तसेच प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार महेश...
6 Aug 2014 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, May 27th, 2014
सोलापूर, (२७ मे) – ‘मी हरणार याची मला पूर्वकल्पना होती कारण माझ्याच पक्षाचे लोक माझ्या विरोधात काम करीत होते. पण माझं नशीब चांगलं की अनामत जप्त झाली नाही,’ अशी कबुली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी सोलापुरात बोलताना दिली. आपल्या परंपरागत मतदारसंघात झालेल्या दारूण पराभवाचे खापर त्यांनी पक्षाच्या लोकांवरच फोडले. ‘आपल्या लोकांकडून दगा होणार याची कल्पना आली होती. म्हणूनच निवडणुकीच्या आधीपासून मी सोलापुरात ठाण मांडून सर्व सूत्रे आपल्या हाती...
27 May 2014 / No Comment / Read More »