किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल=मुंबई हायकोर्टाचा निकाल=
मुंबई, [३० जानेवारी] – पंढरपुरात कायदा व सुरव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने माघी एकादशीनिमित्त आलेल्या वारकर्यांच्या मुक्कामासाठी चंद्रभागेच्या तीरावरच तात्पुरता निवारा बांधण्याची परवानगी प्रशासनाला दिली आहे. न्यायालयाने याच संदर्भातील आपला आधीचा निर्णय काही प्रमाणात शिथिल केल्याने वारकर्यांना दिलासा मिळाला आहे.
आज शुक्रवारपासून दोन दिवस माघी एकादशीला सुरुवात झाली. यासाठी पंढरपुरात वारकरी मोठ्या संख्येत येत आहेत. या वारकर्यांनी चंद्रभागेच्या तीरावर राहुट्या उभारू नये, अशी सूचना प्रशासनाकडून वारकर्यांना करण्यात आली होती. याबाबतची एक जनहित याचिकाही न्यायालयात दाखल झाली आहे. पण, वारकर्यांना चंद्रभागेच्या पात्रात राहुट्या उभारण्याची परवानगी न दिल्यास शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ शकते, याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले होते. सर्व बाजूंनी विचार केल्यानंतर न्या. अभय ओक आणि न्या. ए. के. मेनन यांच्या खंडपीठाने सशर्त निकाल दिला आहे.