किमान तापमान : 31.26° से.
कमाल तापमान : 33.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 31 %
वायू वेग : 1.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
33.99° से.
27.28°से. - 33.99°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल26.7°से. - 30.57°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.81°से. - 29.87°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.37°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल25.19°से. - 29.85°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर कुछ बादल25.22°से. - 29.93°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, [३० जानेवारी] – दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने किरण बेदी यांना आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून जाहीर केले असले आणि कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व सोनिया गांधी यांच्याकडे असले तरी या निवडणुकीत महिला उमेदवारांची संख्या १० टक्केदेखील नाही.
७० जागांसाठी होणार्या निवडणुकीत ६७३ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी महिला उमेदवारांची संख्या फक्त ६३ आहे. महिलांना राजकारणात ३३ टक्के प्रतिनिधित्व देण्याच्या गोष्टी होत असताना ही संख्या अतिशय नगण्य आहे.
भाजपाने सर्वाधिक म्हणजे आठ महिला उमेदवार रिंगणात उतरविल्या आहे. आपने सहा तर, कॉंग्रेसने फक्त पाच महिलांना संधी दिली आहे. भाजपाच्या महिला उमेदवारांमध्ये किरण बेदी (कृष्णानगर), नुपूर शर्मा (नवी दिल्ली), कृष्णा तीरथ (पटेल नगर), रजनी अब्बी (तिमरपूर), नंदिनी शर्मा (मालवीयनगर), रेखा गुप्ता (शालिमार बाग), सरिता चौधरी (मेहरौली) आणि किरण वैद्य ( त्रिलोकपुरी) यांचा समावेश आहे. आम आदमी पार्टीच्या महिला उमेदवारांमध्ये राखी बिर्ला (मंगोलपुरी), अलका लांबा (चांदनी चौक), प्रमिला टोकस (आरकेपूरम), भावना गौर (पालम), वंदना कुमार (शालिमारबाग) आणि सरिता सिंग (रोहतासनगर) यांचा समावेश आहे. कॉंग्रेसने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा (ग्रेटर कैलाश), किरण वालिया (नवी दिल्ली), मीनाक्षी (राजौरीगार्डन), रीटा शौकिन (चंदेला मुंडका) आणि रिंकी (गोकलपूर) यांना उमेदवारी दिली आहे.
२०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत तीन महिला उमेदवार विजयी झाल्या होत्या. विशेष म्हणजे या सर्व आम आदमी पार्टीच्या होत्या. दिल्लीच्या राजकारणात महिलांनी चांगली कामगिरी केली आहे. कॉंग्रेसच्या शीला दीक्षित यांनी सलग १५ वर्षे दिल्लीचे मुख्यमंत्रिपद भूषविले आहे. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि विद्यमान परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अल्पकाळासाठी का होईना दिल्लीचे मुख्यमंत्रिपद भूषविले आहे.