किमान तापमान : 31.26° से.
कमाल तापमान : 33.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 31 %
वायू वेग : 1.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
33.99° से.
27.28°से. - 33.99°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल26.7°से. - 30.57°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.81°से. - 29.87°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.37°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल25.19°से. - 29.85°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर कुछ बादल25.22°से. - 29.93°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश=तेव्हा कुठे होती केजरीवालांची नैतिकता=
नवी दिल्ली, [२९ जानेवारी] – दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर रोज पाच प्रश्नांची सरबत्ती करण्याचा निर्णय भाजपाने गुरुवारी घेतला असून, त्याप्रमाणे पत्रपरिषदेत भाजपा प्रवक्ते आणि केंद्रीय मंत्री राजीवप्रताप रुडी आणि वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन हे पाच प्रश्न विचातील, केजरीवाल यांनी उत्तरे द्यावी, अशी मागणी केली आहे.
भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा घेताना केजरीवाल यांच्या खोट्या प्रचाराला जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुवारपासून ५ फेब्रुवारीपर्यंत भाजपातर्फे केजरीवालांवर प्रश्नांची अशीच सरबत्ती केली जाणार आहे. निवडणुकीच्या आधी कॉंग्र्रेसशी युती न करण्याच्या गोष्टी करणार्या केजरीवाल यांनी सत्तेत येण्यासाठी कॉंग्रेसचा पाठिंबा का घेतला, आपले तत्त्व आणि सिद्धांत बाजूला ठेवून कॉंग्रेसशी असैद्धांतिक युती का केली, तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती, असा प्रश्न विचारला आहे.
कॉंग्रेस नेत्या शीला दीक्षित यांच्या भ्रष्टाचाराची आठ दिवसात एफआयआर दाखल करून चौकशी करण्याची घोषणा केजरीवाल यांनी केली होती. मात्र, सत्तेवर आल्यावर त्यांनी चौकशी का केली नाही, असा दुसरा प्रश्न रुडी यांनी विचारला आहे.
आपण आम आदमी असल्याने कोणतीही सुरक्षाव्यवस्था घेणार नाही असे म्हणार्या केजरीवाल यांनी मुख्यमंत्री झाल्यावर सुरक्षा व्यवस्था का घेतली, असा तिसरा प्रश्न विचारण्यात आला. मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीच्यावेळी मेट्रो आणि वॅगनारने येणार्या केजरीवाल यांनी नंतर फॉर्च्युनर आणि इनोव्हासारख्या महागड्या गाड्या वापरायला का सुरुवात केली आणि अन्य नेत्यांच्या विमान वापरावर टीका करणार्या केजरीवाल यांनी परदेशात निधी संकलनासाठी जाताना विमानात बिझनेस क्लासचा वापर का केला, असा पाचवा प्रश्न भाजपातर्फे त्यांना विचारण्यात आला.