किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल=रामविलास पासवान यांची माहिती=
पाटणा, [२८ जानेवारी] – रालोआतील मुख्य घटक असलेला भाजपा हा आम्हाला मोठ्या भावासारखा आहे आणि बिहारमध्ये याचवर्षी होणारी विधानसभेची निवडणूक आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात लढणार आहोत, अशी माहिती लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी बुधवारी येथे दिली.
बिहार निवडणुकीत रालोआतील घटक पक्षांमध्ये जागावाटप हा फार मोठा मुद्दा राहणार नाही. लोजपाला किती जागा मिळतील, हादेखील आमच्यासाठी चिंतेचा विषय नाही. आपल्या पक्षाला इतक्याच जागा मिळायला हव्या, असा आग्रहदेखील मी करणार नाही, असे पासवान यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
कोणी किती जागा लढवाव्या आणि कुठून लढावे, हा रालोआतील अंतर्गत मुद्दा आहे आणि घटक पक्षांच्या बैठकीतच तो सोडविला जाणार आहे. राज्यातून जदयुला सत्तेबाहेर करणे, हाच आमचा एकमेव उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.