किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलसोलापूर, [७ ऑगस्ट] – सोलापूरचा आनंद बनसोडे आता दक्षिण आफ्रिकेतील सव्र्वोच्च शिखर असलेले ‘किलीमांजारो’ वर शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी तिरंगा फडकवून भारताचे राष्ट्रगीत वाजविणार आहे. त्यानित्ताने शुक्रवार, ८ ऑगस्ट रोजी तो या मोहिमेवर रवाना होत असल्याची माहिती उद्योजक प्रमोद साठे, अभियंता राजेश जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एव्हरेस्टवीर, एब्रुसवीर अशी ख्याती मिळविल्यानंतर अवघ्या क ाही दिवसातच किलीमांजारो सर करण्याची घोषणा आनंद बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. एकाच महिन्यात दोन खंडातील सर्वोच्च शिखर सर करण्याचा हा विक्रम होणार आहे. किलीमांजारो हे १९ हजार ३४१ फू ट उंच असून आनंद बनसोडे हा एकटा चढाई करणार आहे. निसर्ग वाचवाचा संदेश यानिमित्ताने तो देत आहे.
दक्षिण आफ्रिका खंडातील किलीमांजारो हे टांझानिया या देशात असून त्याच्या उत्तरेला ज्वालामुखी पर्वत आहे. याला उथरु शिखर असेही म्हणतात. हा पर्वत तीन जिवंत ज्वालामुखींनी बनलेला आहे. यातील किलीमांजारो हा जगातील सर्वात मोठा फ्रि स्टॅडिंग प्रकारचा पर्वत आहे. येत्या वर्षभरात आणखी काही शिखरे सर करण्याची घोषणा आनंद बनसोडे यांनी केली. यंदाच्या मोहिमेचे प्रायोजकत्व पुण्यातील मूळचे सोलापूरचेच असलेले बांधकाम व्यावसायिक प्रमोद साठे यांनी स्वीकारले आहे.
पत्रकार परिषदेस सतीश देशमुख, प्रा. मनोहर साठे, गुरुशांत धुत्तरगावकर, उमाकांत गुंड आदी उपस्थित होते.