किमान तापमान : 26.99° से.
कमाल तापमान : 27.98° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.39 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.99°से. - 29.5°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 30.84°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.76°से. - 30.97°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.93°से. - 30.63°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.46°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल26.12°से. - 29.61°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश=‘मातोश्री’ वर झाला शिवसेना प्रवेश=
सोलापूर, [६ ऑगस्ट] – अखेर सोलापूर महानगरपालिकेतील काँग्रेसचे पक्षनेते महेश कोठे यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज खांद्यावर घेत शिवबंधनाची बांधिलकी उध्दव ठाकरेंकडून बुधवारी घेतली. २५ माजी नगरसेवकांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत रिसतर प्रवेश केला. लवकरच सोलापुरात येऊन मेळावा घेऊ. शिवसेनेच्या कामाला लागा, असं उध्दव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शहरप्रमुख प्रताप चव्हाण, संपर्क प्रमुख पुरूषोत्तम बरडे तसेच प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार महेश कोठे यांच्याबरोबर काँग्रेसमधील काही विद्यमान नगरसेवकही जाणार होते मात्र तांंत्रिक अडचणीमुळे त्यांचा प्रवेश झालेला नाही. मात्र माजी नगरसेवक लक्ष्मण गायकवाड, नंदा माळगे, नसिम बागवान, नारायण माशाळकर, अविनाश बोमड्याल, मोहन कोंडी, सुरेश तमशेट्टी, तुकम्माबाई ईराबत्ती, मोहन कोंडी, जयश्री सफार, अंबिका आडकी, प्रमोद काशिद, महादेव बिद्री, प्रमुख कार्यकर्ते युनूसभाई नदाफ, सत्तार शेख, खलिफ बागवान, नितीन करवा यांचा समावेश आहे. उध्दव ठाकरे यांनी सर्व कार्यकत्र्यांचे स्वागत केले. त्यांच्याकडून सत्कार आणि सोलापूर भेटीचं निमंत्रण स्वीकारलं. मात्र मार्कंडेय रथोत्सवादिवशी सोलापूरला येणं गडबडीचं होईल पुन्हा पाहू असं सांगितलं.
प्रवेश प्रक्रियानंतर महेश कोठे यांनी उध्दव ठाकरे यांची स्वतंत्रपणे बंद खोलीत भेट घेऊन उमेदवारीबाबत चर्चा केली.