किमान तापमान : 26.99° से.
कमाल तापमान : 27.98° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.39 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.99°से. - 29.5°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 30.84°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.76°से. - 30.97°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.93°से. - 30.63°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.46°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल26.12°से. - 29.61°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश=आठ लाख युझर्सना फटका=
नवी दिल्ली, [३० जुलै] – तंत्रज्ञान जसजसे व्यापक होत जाते, सर्वदूर पोहोचते तसतसे त्याच्यात अडथळे येण्याचे किंवा आणण्याचे प्रकार घडतात. नवीन लोकप्रिय सोशल साईट्सबाबतही असेच घडत आहे. सोशल मीडियातील सर्वांत मोठी वेबसाईट असलेल्या फेसबुकला नव्या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत फेसबुकवरील सुमारे आठ लाख अकाऊंटसमध्ये हा व्हायरस शिरल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या व्हायरसमुळे फेसबुक वॉलवर आपल्याला मित्राने पाठविलेल्या बनावट व्हिडीओची लिंक दिसते. या व्हिडीओवर क्लिक केल्यानंतर एक वेगळीच वेबसाईट ओपन होते व तेथे हा व्हिडीओ पाहण्यासाठी ‘प्लग इन’ डाऊनलोड करण्याची सूचना येते. प्लग इन डाऊनलोड करण्याचा पर्याय स्वीकारताच या व्हायरसचे काम सुरू होते. या प्लग इनच्या आधारे व्हायरस युजरच्या फेसबुक, ट्विटर आणि ई-मेल अकाऊंटमध्ये प्रवेश मिळवतो. त्यानंतर, त्या युजरची सर्व खाजगी माहिती काढून घेतली जाते आणि त्याच्या फेण्डस्लिस्टमधल्या अन्य एका युजरच्या वॉलवर त्याच्या नावे अशाच बनावट व्हिडीओची लिंक दिसू लागते. असा या व्हायरसचा फैलाव सुरू आहे. या व्हायरसचा फैलाव वेगाने सुरू असून, दर तासाला सुमारे ४० हजार अकाऊंटसमध्ये या व्हायरसचा शिरकाव होत असल्याची माहिती सोशल नेटवर्किंग तज्ज्ञ कार्लो डी मिचेली यांनी दिली. गूगलने या व्हायरसचा फैलाव थांबवण्यासाठी गूगल क्रोम ब्राऊजरची ‘एक्स्टेंशन्स’ बंद केली आहेत. तथापि, सायबर हल्लेखोरांनी व्हायरस पसरवण्यासाठी गूगल क्रोमपासून सुरुवात केली असली, तरी आता व्हायरसला रोखणार्या पर्यायांमधून मार्ग काढण्यासाठी हल्लेखोरांचे प्रयत्न सुरू आहेत. हल्लेेखोरांनी मोझिला फायरफॉक्स ब्राऊझरसाठी यापूर्वीच असे मार्ग शोधले असल्याचे मिचेली यांनी सांगितले.
या नव्या हल्ल्यामध्ये अत्यंत सावध मार्गाने फेसबुकचा वापर युजर्सची खाजगी माहिती काढून घेण्यासाठी तसेच व्हायरसचा प्रसार करण्यासाठी करण्यात आला आहे. त्यामुळेच, हा हल्ला अधिक धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. फेसबुकवर फोटो आणि व्हिडीओ यांची मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण होत असल्याने युजरना या व्हायरसबाबत संशय येत नाही. त्याचप्रमाणे, अनेकदा फेेसबुकवरील व्हिडीओ पाहण्यासाठी नवे प्लग-इन सहज डाऊनलोड केले जातात. शिवाय, हा व्हायरस घेऊन येणारा व्हिडीओ हा एखाद्या जाहिरातीसारखा नसून, खरोखर मित्राने आपल्यासाठी शेअर केल्यासारखा दिसत असल्याने त्याच्याकडे सहसा दुर्लक्ष केले जात नाही.
सायबर हल्लेखोरांनी आता युजर्सची खाजगी माहिती काढून घेण्याचे नवनवीन मार्ग शोधून काढले आहेत. त्यामुळे व्हायरस हा कोणत्या स्वरूपात येईल, हे सांगणे कठीण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आता सोशल नेटवर्किंग साईटवर येणार्या प्रत्येक गोष्टीकडे सावधपणे पाहायची सवय युजर्सनी लावून घ्यायला हवी. वॉलवर एखादा व्हिडीओ शेअर करायचा झाल्यास त्यासोबत काही कमेंट लिहिण्याची सवयही युजर्सनी ठेवावी. म्हणजे शेअर झालेला व्हिडीओ हा बनावट नसून, मित्रांनीच पाठवला असल्याचे ओळखणे फ्रेण्ड्सलिस्टमधील अन्य युजर्सना शक्य होईल.