किमान तापमान : 27.31° से.
कमाल तापमान : 27.95° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 3.77 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.31° से.
26.99°से. - 30.4°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.67°से. - 31.27°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.13°से. - 31.45°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 30.35°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.72°से. - 30.45°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.49°से. - 29.96°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाशलंडन, [२७ जुलै] – आता या प्रेमवीरांच्या हातात असे ऍप आले आहे की उदास गीत गाण्याची त्यांच्यावर वेळच येणार नाही. यापूर्वीच त्यांना आपल्या जोडीदाराचे वास्तव समजले असेल. आपण जिच्यावर जीवापाड प्रेम करतो ती आपली प्रेयसी दुसर्याच्या मागे गेली किंवा दुसर्याने तिला गटवली तर प्रियकराचा पार ‘देवदास’ होतो. हेच तत्त्व प्रेयसीलाही लागू पडते. ज्याच्यावर जीव ओेवाळला आणि सात जन्म एकत्र राहण्याचा आणाभाका घेतल्या तो प्रियकर दुसर्या मुलीच्या प्रेमात पडला तर ती प्रेयसीही खचून जाते. बरे आपला जोडीदार दुसर्याच्या प्रेमात पडला आहे किंवा त्याचे काही ‘अफेअर’ आहे, हे एकदम कळणार कसे? प्रेम आंधळे, मुके (आणि बहिरे) असते असे म्हणतात. त्यामुळे ‘प्यार मे पागल’ झालेल्या प्रेमवीरांना ‘बेवफा सनम’ कशी ओळखायला येणार? त्यांच्यामागे गुप्तहेर तर लावता येणार नाही.
स्मार्टफोन किंवा किंवा फेसबुक, गूगल, ई-चॅट अथवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना आपल्या ‘भानगडी’ किंवा अफेअर्स सहजपणे लपविणे शक्य होते. अनेकदा तर अशा अफेअर्सची सुरुवात या ‘स्मार्ट’ तंत्रज्ञानाचा वापर करूनच होते. मात्र, प्रेम करणार्यांनो आता काळजी करू नका. तुमची प्रेयसी किंवा प्रियकर तुमच्यापासून काही लपवत असेल तर ‘त्याच्या’ किंवा किंवा ‘तिच्यावर’ लक्ष ठेवणारे ऍप तुमच्या मदतीला धावून येणार आहे. तेव्हा बिनधास्त प्रेम करा.
‘एम कपल’ नावाच्या या ऍपच्या मदतीने तुम्ही तुमच्या जोडीदारावर लक्ष ठेवू शकता. इंग्लंडमधील ‘एमस्पा’ या कंपनीने या ऍपची निर्मिती केली आहे. वास्तविक, आपल्या मुलामुलींवर पालकांना लक्ष ठेवता यावे यासाठी तज्ज्ञांनी या ऍपची निर्मिती केली आहे. मात्र, याचा वापर जोडीदार किंवा प्रियकर, प्रेयसी यांच्या हालचालींवर किंवा त्यांच्या संपर्कावर लक्ष ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. हे ऍप संबंधित व्यक्तीच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर त्या फोनवरील सर्व फोन कॉल्स, एसएमएसची माहिती मिळविता येते. तसेच फोनमधील फेसबुक आणि अन्य सोशल नेटवर्किंग साईट्सवरील सर्व तपशील मिळविता येतो. एवढेच नव्हे, तर जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करून आपले मित्र-मैत्रीण, किंवा प्रियकर-प्रेयसी कुठे आहेत, याचाही शोध आता या आधुनिक प्रेमवीरांना घेता येणार आहे. तेव्हा प्रेम करून धोका देणार्यांनो सावधान, तुमच्या भानगडी फार काळ गुप्त राहू शकणार नाहीत.