किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलमुंबई, [२७ जुलै] – डेबिट कार्ड वापरकर्त्यांच्या पैशांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने काही आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सर्व बँकांनी आपल्या डेबिट कार्ड युझर्सच्या कार्डवर फोटो लावण्याचे आदेश आरबीआयने अधिनस्त बँकांना दिले आहेत. आतापर्यंत फक्त क्रेडिट कार्ड धारकांनाच ही सुविधा मिळत असे. याशिवाय आणखी एका महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, आता कार्डधारक आपल्या डेबिट कार्डचा विमाही काढू शकणार आहेत. या विम्याच्या मदतीने कार्ड हरवल्यानंतरही युझर्सना विमा संरक्षण मिळू शकेल.
ज्या युझर्सकडे आधीपासूनच डेबिट कार्ड आहे ते आपल्या कार्डाचे नूतनीकरण करताना नवे कार्ड घेऊन त्यावर फोटो लावू शकतात, असे आरबीआयच्या प्रवक्त्याने प्रसार माध्यमांना सांगितले आहे. त्याचबरोबर बँकांनी आपल्या युझर्सची स्वाक्षरी लॅमिनेट करण्याचेही निर्देश आरबीआयने दिले आहेत. सध्या कार्ड मिळाल्यानंतर ग्राहक त्यावर सह्या करतात. जेणेकरून कार्ड हरवल्यानंतर परस्पर कोणालाही पैसे काढणे शक्य होत नाही. आपल्या देशात सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण पाहता आरबीआयने हे पाऊल उचलले असल्याचे सूत्राने स्पष्ट केले आहे.