किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल=महाराष्ट्र सदनातील घटना, नितीन गडकरी यांचा आरोप=
नाशिक, [२६ जुलै] – निवडणुका आल्यानंतर जातीयतेचे कार्ड खेळणे कॉंगे्रस व राष्ट्रवादी कॉंगे्रसची जुनीच सवय आहे. महाराष्ट्रात तीन महिन्यांवर विधानसभेची निवडणूक असल्याने या दोन्ही कॉंगे्रसने महाराष्ट्र सदनातील घटनेला जातीय रंग देण्याचे प्रयत्न चालविले आहेत, असा आरोप केंद्रीय भुपृष्ठ परिवहन, राष्ट्रीय महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केला.
महाराष्ट्र सदनातील प्रकार इतका गंभीर नव्हता. आपण ज्याला चपाती खायला सांगत आहो, ती व्यक्ती मुसलमान आहे, याची माहिती शिवसेना खासदारांना नव्हतीच. चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी माफीही मागितली. पण, आपल्या सवयीप्रमाणे कॉंगे्रसने या घटनेलाही जातीय रंग दिला आहे, असे गडकरी यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना सांगितले.
विधानसभा निवडणूक तोंडावरच असल्याने भाजपा व शिवसेनेला बदनाम करण्याचा हा कट आहे. नरेंद्र मोदी यांच्या लाटेत विधानसभा निवडणुकीतही आपला टिकाव लागू शकणार नाही, याची खात्री दोन्ही कॉंगे्रसला झालेली दिसते, असा चिमटाही त्यांनी काढला. देशात विषमता, भूकबळी आणि बेरोजगारी या समस्या कॉंगे्रसचीच देण आहे. कॉंगे्रसने आजवर केवळ एका विशिष्ट समाजालाच खुश ठेवण्याचा प्रयत्न केला असा आरोपही गडकरी यांनी केला.