किमान तापमान : 26.99° से.
कमाल तापमान : 27.78° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 3.82 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.99°से. - 30.4°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.67°से. - 31.27°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.13°से. - 31.45°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 30.35°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.72°से. - 30.45°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.49°से. - 29.96°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशपुणे, [३० जून] – अमेरिका आणि चीनच्या अर्थव्यवस्थेत दिसत असलेली सुधारणा चांदीच्या दरवाढीचे संकेत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर जगभरात शेअरबाजार तेजीत येत असल्यानेही चांदीचे दर वाढण्याची शक्यता दाट असून दिवाळीपर्यंत चांदी पुन्हा किलोला ४८ हजार रुपयांपर्यत झेप घेईल, असे या क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत. गेल्या दोन दिवसांत चांदीच्या दरात ४०० रुपये वाढ नोंदविली गेली आहे.
सर्वसाधारणपणे सोन्या-चांदीच्या दरातील चढउतार समानच असते. मात्र यंदा चांदीचे दर सोन्याच्या तुलनेत बरेच स्थिर राहिले आहेत. ट्रस्टलाईनचे राजीव कपूर यांच्या मते चांदीच्या किंमती कमी होण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे. बजेटमध्ये चांदीवरील आयात कर कमी केला गेला तरीही चांदी फारशी उतरण्याची शक्यता नाही. सोन्यातील गुंतवणुकीचे आकर्षण आता गुंतवणुकदारांना राहिलेले नाही. कारण शेअर बाजार तेजीत आला आहे. दिवाळीत चांदीचे भाव ४८ हजारांवर जातील असे सध्याचे चित्र आहे.
कोटक कमोडिटीच्या धर्मेश भाटिया यांच्या म्हणण्यानुसार सोन्याचे दर घसरले असले तरी चांदीचे करेक्शन झाले आहे. यापुढे हे दर आणखी कमी होण्याची शक्यता नाही. अमेरिकेच्या औद्योगिक उत्पादनात तसेच घरांच्या विक्रीत वाढ दिसून येत आहे याचा अर्थ अर्थव्यवस्था सुधारते आहे. परिणामी औद्योगिक क्षेत्राकडून चांदीची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने चांदी महागेल. त्यामुळे चांदी दीर्घकाळासाठी आकर्षक गुंतवणूक राहण्याची चिन्हे आहेत.