किमान तापमान : 28.5° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 2.86 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.34°से. - 30.71°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.15°से. - 29.76°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.65°से. - 30.93°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.1°से. - 31.17°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.59°से. - 30.7°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.71°से. - 30.37°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशसोलापूर, [९ नोव्हेंबर] – हैदराबाद येथील खासदार असदुद्दिन ओवैसी यांचा एमआयएम हा देशद्रोही पक्ष असल्याची प्रखर टीका करणार्या कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना त्या पक्षाने कायदेशीर नोटीस बजावली आहे.
आपण केलेल्या वक्तव्याबाबत आठ दिवसात जाहीर माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे एमआयएमच्या वकिलांनी प्रणिती शिंदे यांना पाठविलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. देशद्रोही, दहशतवादी आणि एमआयएम यांच्यात काहीच फरक नाही. त्यामुळे या पक्षावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी प्रणिती शिंदे यांनी नुकतीच केली होती.
प्रणिती शिंदे यांचे वडील केंद्रीय गृहमंत्री असलेल्या कॉंग्रेसप्रणीत संपुआ सरकारला एमआयएमने पाठिंबा दिला तेव्हा हा पक्ष देशद्रोही नव्हता का? अणुकराराच्या मुद्यावर संपुआ सरकारला एकेक मताची गरज असताना एमआयएम देशद्रोही नव्हता का? असे काही खडे सवाल खासदार ओवैसी यांनी प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना उपस्थित केले होते. यानंतर एमआयएमच्या वकिलांनी कायदेशीर नोटीस पाठवून कारवाई करण्याचा इशारा दिल्यामुळे प्रणिती शिंदे यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.