किमान तापमान : 28.76° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 5.62 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.43°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.65°से. - 29.75°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशबालासोर (ओडिशा), [९ नोव्हेंबर] – अण्वस्त्रासह मध्यम पल्ल्यापर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या अग्नी-२ या क्षेपणास्त्राची भारताने आज रविवारी यशस्वी चाचणी घेतली.
दोन हजार किमी अंतरापर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची भारतीय लष्करासाठी ही नियमित चाचणी घेण्यात आली. जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र इंटग्रेटेड टेस्ट रेंजस्थित (आयटीआर) लॉन्च कॉम्प्लेक्स-४ येथून आज सकाळी ९.४० वाजता हवेत झेपावले, असे संरक्षण खात्याच्या अधिकार्याने याबाबत माहिती देताना सांगितले. या अत्याधुनिक क्षेपणास्त्राची ही चाचणी पूर्णपणे यशस्वी ठरली, असे आयटीआरचे संचालक एमव्हीकेव्ही प्रसाद यांनी सांगितले.
अग्नी-२ इंटरमिजिएट रेंज बॅलेस्टिक मिसाईल (आयआरबीएम) यापूर्वीच भारतीय लष्कराच्या सेवेत सामील करण्यात आले आहे आणि आज रविवारी घेण्यात आलेली चाचणी ही लष्करात विशेष करून स्थापन करण्यात आलेल्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडसाठी डीआरडीओच्या मदतीने घेण्यात आलेली सराव चाचणी होती, असे अधिकार्याने सांगितले. दोन टप्प्याच्या या अत्याधुनिक क्षेपणास्त्रात लक्ष्याचा अचूक भेद घेणारी नेव्हिगेशन यंत्रणा बसविण्यात आली आहे.