किमान तापमान : 28.5° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 2.86 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.34°से. - 30.71°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.15°से. - 29.76°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.65°से. - 30.93°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.1°से. - 31.17°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.59°से. - 30.7°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.71°से. - 30.37°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशमुंबई, [९ नोव्हेंबर] – पुढच्या वर्षी नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावर भरणार्या कुंभमेळाव्यात चेंगराचेंगरी किंवा दहशतवादी हल्ला होऊ नये, यासाठी पुरेशी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात यावी, अशा आशयाची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याआधी म्हणजे २००३च्या कुंभमेळाव्यात योजनेचा अभाव आणि पुरेशा मुलभूत सुविधा नसल्यामुळे २९ यात्रेकरूंना आपला जीव गमवावा लागला होता, तर ११८ जणांना गंभीर स्वरूपाच्या जखमांना तोंड द्यावे लागले होते. दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळ्याचा उत्सव पुढील वर्षी जुलै महिन्यात सुरू होणार असून यावेळी जवळपास एक कोटी भाविक नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. समितीने आपल्या याचिकेत, अतिरिक्त पोलिस दलांच्या तैनातीसह जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, अशीही विनंती केली आहे.
आपल्या याचिकेत धार्मिक स्थळांवर याआधी दहशतवादी हल्ले झाल्याचा संदर्भ देत वाढीव सुरक्षा बंदोबस्ताची मागणी केली आहे. याशिवाय, मूलभूत सुविधांसाठी पुरेसा निधी आणि जमीन देण्यात यावी, अशी विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे. मेळाव्याच्या एकूण आयोजनासाठी चार हजार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.