किमान तापमान : 24.02° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.02° से.
23.64°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल=सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा, कर्ज आणि परतफेडीच्या दुष्टचक्रातून महाराष्ट्राला बाहेर काढण्याचा निर्धार=
नागपूर, [९ नोव्हेंबर] – कालपर्यंत महाराष्ट्राच्या केवळ काही भागापुरतीच मर्यादित राहिलेली डेक्कन ओडीसी रेल्वे येत्या काळात विदर्भात आणण्याची आणि त्यातून देशविदेशातील पर्यटकांना या परिसरातल्या समृद्ध वन व निसर्गसंपदेचे दर्शन घडवीत येथील वनपर्यटन अधिक विकसित करण्याची घोषणा राज्याचे नवनियुक्त वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
रविवारी नागपुरातील भाजपा कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी अर्थमंत्री या नात्याने बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी सध्याच्या कर्ज आणि कर्जाच्या परतफेडीच्या दुष्टचक्रातून महाराष्ट्राला बाहेर काढण्याचा निर्धार व्यक्त केला. आज महाराष्ट्रावर सुमारे तीन लक्ष कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्याच्या नुसत्या व्याजापोटी वर्षाला तेवीस हजार कोटी रुपयांचा भरणा करावा लागतो. या कर्ज आणि त्याच्या परतफेडीच्या चक्रात अडकल्याने राज्याच्या विकासाला गती देता येत नाहीय्. म्हणूनच सध्याच्या स्थितीची श्वेतपत्रिका काढण्याला तर सरकारचे प्राधान्य राहीलच पण, येत्या काळात या परिस्थितीतून राज्याला बाहेर काढत विकास कामांची दशा बदलवित त्याला योग्य दिशा देण्याचे काम केले जाणार आहे. राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्याचा मानसही वित्तमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. यातून सध्याच्या सव्वाचारशेपैकी किमान २२५ सिंचन प्रकल्प प्राधान्याने पूर्ण होऊ शकतील, असे ते म्हणाले. शेतकरी, बेरोजगार युवक, महिला बचतगट, पायाभूत सुविधा यांना प्राधान्य देत या राज्यातील भांडवली खर्च वाढावा आणि महसुली तूट कमी व्हावी यादृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, वनविभागाच्या माध्यमातून पर्यटकांसाठीची डेक्कन ओडीसी रेल्वे गाडी विदर्भाकडे वळविण्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथे बांबू प्रशिक्षण केंद्र उभारण्याची, ताडोबा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याची योजनाही त्यांनी विशद केली. गेली काही वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या बांबू मिशन योजनेला नव्याने आकार देण्याचा मानसही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.