किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, [१० नोव्हेंबर] – सॉफ्टवेअर क्षेत्रात जगात दुसर्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी असलेल्या इन्फोसिसने अमेरिकेत २१०० पेक्षा जास्त तरुणांना रोजगार देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
या नव्या नियुक्त्यांमुळे डिजिटल, ऍनेलिटिक्स आणि क्लाऊड यासह इतर क्षेत्रातही इन्फोसिसची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. अमेरिकेतील आपला व्यवसाय वाढविण्यासोबतच कंपनीची क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने इन्फोसिसने हा निर्णय घेतला आहे, असे कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकार्याने स्पष्ट केले. नवीन भरती करण्यात आल्यानंतर स्थानिक बाजारपेठांमधील ग्राहकांचा कल, तांत्रिक कौशल्य आणि इतर महत्त्वपूर्ण गोष्टींवर लक्ष देण्यासाठी वेळ मिळणार आहे. कंपनीच्या मते, १५०० जणांना याच आर्थिक वर्षात सल्लामसलत, विक्री, पुरवठा यासाठी वेगवेगळ्या पदांवर नियुक्त करण्यात येणार आहे, तर पुढील १२ महिन्यात अमेरिकन विश्वविद्यालयातील जवळपास ६०० पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना नियुक्त करण्यात येणार आहे.
सध्या इन्फोसिसमध्ये १.६५ लाखापेक्षा अधिक कर्मचारी आहेत आणि या कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी ६०.८ टक्के उत्पन्न उत्तर अमेरिकेतून मिळाले. सप्टेंबर महिन्यात जाहीर झालेल्या अहवालानुसार, कंपनीचे तिमाही उत्पन्न १३,३४२ कोटी रुपये इतके आहे.