किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलसोलापूर, [१३ नोव्हेंबर] – बेधडक आणि बिनधास्त कामगिरीसाठी परिचित असलेले सोलापूर महापलिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी तब्बल वर्षभरानंतर आपल्या कामगिरीची प्रचिती सोलापूरकरांना दिली. गुरुवारी सकाळी ७ वा. मुर्गीनाला, लष्कर, बापूजीनगर, मुस्लिम पाच्छापेठेतील बेकायदा कत्तलखान्यांवर अचानक धाड घालून २८ गोधनांचे प्राण वाचविले. कसायांच्या तावडीतून गाय व वासरांची सुटका करून गोशाळेत त्यांची रवानगी केली.
दरम्यान या घटनेची खबर मिळताच कॉंग्रेसजनांनी कसायांवरील फौजदारी कारवाई टाळण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला. दुसरीकडे सायंकाळी विमानतळाजवळील सहा पत्राशेड हटविण्याची कारवाई मनपा अतिक्रमण पथकाने पार पाडली.गोधनाची हत्या करण्यास कायद्यााने बंदी आहे, तरीही सोलापुरात हेतूत: गोधनाची कत्तली केल्या जातात. शिवाय यामध्ये गाय (स्त्री जात) व वासरूंची सर्रास कत्तली करण्याच्या प्रकाराची तक्रार आयुक्तांकडे दोनच दिवसांपूर्वी पशुधन बचावच्या कार्यकर्त्यांनी केली होती. मनपाचा अधिकृत कत्तलखाना नाही, हे कारण पुढे काही मोहल्ल्यांमध्ये भर वस्तीत अवैधपणे कत्तलींचे शेड उभारले आहेत, याची खबर आयुक्तांना होती, पण त्यांना आज मुहूर्त मिळाला. आयुक्त गुडेवार यांनी निडरपणाने मोहीम राबविल्यामुळे गोधन बचावाचे कार्य यशस्वीपणे पार पडले. ही मोहीम राबविण्यापूर्वी त्यांनी कोणालाही पूर्वखबर दिली नाही, त्यामुळे पोलिसांसह पथक अचानकपणे कत्तलखान्यात आल्यानंतर तेथील कसायांची पळताभुई थोडी झाली. गतवर्षी याच काळात गुडेवार यांनी एलबीटी वसुलीची अशीच बेधडक मोहीम राबवून दरारा निर्माण केला होता. त्यानंतर वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर सोलापूरकरांना रूद्रावतारातील गुडेवार दिसले. सिव्हील हॉस्पीटलसमोरील आरोग्य विभागाच्या भांडारगृहामागे मुस्लिम पाच्छा पेठ तसेच लष्कर भागातील मुर्गी नालाजवळ कुरेशी गल्लीत आयुक्तांनी पोलीस बंदोबस्तात धाड टाकली. मुर्गीनाला येथील कुरेशी गल्लीत एका घरामध्ये एका गायीचे पाय दोरीने बांधून कसायाकडून तिची कत्तल करण्याची तयारी सुरू होती.
आयुक्तांचे पथक पाहताच कसायी पसार झाले. त्यापैकी एकजण हाती लागला. पण बेकायदा कत्तलखान्यांचे चालक कोण याचा पत्ता लागला नाही. पण अचानकपणे झालेल्या कारवाईमुळे गोधनांचे प्राण वाचले, याचे पशुधन समर्थकांना समाधान वाटले. ही धडक मोहीम सकाळी नऊपर्यंत सुरू होती. या पथकात अतिरिक्त आयुक्त विलास ढगे, सहायक आयुक्त प्रदीप साठे, प्रभारी नगर अभियंता गंगाधर दुलंगे, अतिक्रमण विभागाचे प्रमुख मोहन कांबळे आदी यावेळी उपस्थित होते. तसेच विमानतळाजवळ पशुहत्येनंतर प्रक्रिया करणारे उद्योग असलेेले शेडही मनपाने जेसीबीच्या साह्याने काढून टाकले. या ठिकाणी हाडे, चरबी, शिंगे आणि अन्य अवयवांवर प्रक्रिया केली जाते, अशी माहिती मोहन कांबळे यांनी दिली.
कत्तलखान्यांवर धाडीची माहिती मिळताच कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक इब्राहिम कुरेशी, रफिक हत्तुरे यांनी आयुक्त गुडेवार यांची भेट घेतली. कारवाईत हस्तक्षेपाचा प्रयत्न केला, पण त्यांना जुमानले नाही. कारवाईप्रसंगी येथे काही सांगू नका, महापालिकेत येउन सांगा, असे त्यांना सुनावले. यानंतर दुपारी १२ वाजता बेकायदा कत्तलखानेचालकांचे शिष्टमंडळ मनपात दाखल झाले. नगरसेवक रफिक हत्तुरे, फिरदोस पटेल, देवेंद्र भंडारे, जॉन फुलारे, शौकत पठाण आदी मंडळीही दाखल झाली. आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. मनपाकडून या प्रकरणी फौजदारी कारवाई होऊ नये, अशी शिष्टमंडळाची मुख्य मागणी होती. मात्र यापुढे बेकायदा कत्तलीचे प्रकार घडल्यास फौजदारी कारवाईची तंबी दिली. यावेळी गोशाळेत जमा केलेल्या पशुधनाची मागणीही कसायी व्यावसायिक करीत होते, परंतु त्यांना जुमानले नाही. त्यामुळे २८ गाय व वासरू गोशाळेतच सुरक्षित राहिले.