किमान तापमान : 30.79° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 0.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.34°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशसोलापूर, [१४ ऑक्टोबर] – सोलापूर येथील पंचायत समितीचे सदस्य व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते गुरूनाथ जगदेवप्पा कटारे यांचा सोमवारी रात्री साडेनऊ च्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून खून करण्यात आला. तर अन्य एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. मतदानाला आता केवळ काही तास उरले असतानाच हा प्रकार घडल्यामुळे राजकीय वादातून हा खून झाल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी कटारे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र नंतर माघार घेत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अक्कलकोट मतदारसंघातील उमेदवार दिलीप सिद्धे यांना पाठींबा दिला होता.
सोमवारी रात्री गुरूनाथ कटारे हे आपले कार्यकर्ते नबीलाल इस्माईल शेख यांच्यासोबत दुचाकीवरून वस्तीतील घराकडे निघाले होते. त्याचवेळी विडी घरकूलजवळील माचर्ला मिलजवळ आल्यानंतर समोरून दुचाकीवरून येणार्या तिघांनी शस्त्रांसह त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना तातडीने सोलापूरच्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर नबीलाल यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कटारे यांच्या खुनाचे वृत्त कळताच रूग्णालयात कार्यकर्त्यांनी मोठया प्रमाणावर गर्दी केली. राजकीय वैमनस्यातून कटारे यांचा खून झाल्याचा आरोप भाजपा आमदार सिद्रामप्पा पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली.