किमान तापमान : 23.35° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.35° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलचंद्रपूर, [१६ ऑक्टोबर] – घरातील महिला सजग असेल, तर कुटुंबात आणि आपल्या शेजारील घरांमध्ये चांगले परिवर्तन घडू शकते, असे मत राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी व्यक्त केले.
येथील मैत्रीय छात्रावासाला शांताक्का यांनी भेट दिली, त्यावेळी आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. यावेळी विदर्भ प्रांत कार्यवाहिका सुलभा गौड, सहकार्यवाहिका अंचल देशपांडे यांची उपस्थिती होती.
यावेळी शांताक्का यांनी छात्रावासामधील सेविकांशी चर्चा केली. आजची परिस्थिती बघता मी, माझे कुटुंब, माझी जबाबदारी काय, त्यासाठी मी काय प्रयत्न करावे, समाजाच्या उन्नतीत माझा हातभार कसा लागेल, याबाबतची विस्तृत माहिती त्यांनी छात्रावासातील सेविकांना दिली. उपस्थित प्रश्नांचेही निराकरण त्यांनी केले. स्त्रियांवरील अत्याचार, दुरदर्शनवरील अश्लील मालिका, मोबाईलचे दुष्परिणाम यावर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन अंजली हिरूळकर यांनी केले. मालु थावरी यांनी श्लोकांच्या माध्यमातून महिला वर्ग एकत्रित करण्याबाबतची महिती दिली. कार्यक्रमाला चंद्रपूर नगर कार्यवाहिका वनिता मडपूरवार, वनवासी कल्याण आश्रमाच्या प्राजक्ता भालेकर, विवेकानंद केंद्राच्या जया भारत, दुर्गावाहिनीच्या वर्षा महात्मे, मंजुषा कासनगोट्टूवार यांची उपस्थिती होती.