किमान तापमान : 24.75° से.
कमाल तापमान : 26.91° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 6.52 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.91° से.
23.74°से. - 27.99°से.
रविवार, 12 जानेवारी कुछ बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलपरभणी, [१४ ऑक्टोबर] – विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास उरलेले असतानाच, परभणी मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार ऍड. विनोद दुधगांवकर यांनी सोमवारी संध्याकाळी अचानक शिवसेनेच्या उमेदवाराला आपले समर्थन जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सेना-मनसेतील मतविभाजनाचा फायदा ओवैसीच्या मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन म्हणजे एमआयएमच्या उमेदवाराला होऊ नये, म्हणूनच हा निर्णय घेतल्याचे मनसे उमेदवाराने स्पष्ट केले आहे.
मनसेचे परभणीचे उमेदवार विनोद दुधगावकर शिवसेना कार्यालयात पोहोचताच सर्वजण अवाक् झाले. आपण शिवसेना उमेदवार डॉ. राहुल पाटील यांना समर्थन देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. परंतु, एमआयएमचे उमेदवार सज्जू लाला यांना रोखण्यासाठी आणि मतविभाजन टाळण्यासाठीच ही खेळी असल्याची चर्चा आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चांगलीच रंगली होती. महाराष्ट्राच्या भल्यासाठी गरज भासल्यास आम्ही एकत्रही येऊ, असे सूचक विधान करून राज यांनी या चर्चेला हवा दिली होती. पण नंतर, उद्धव यांनी आपल्याला प्रतिसादच न दिल्याचा गौप्यस्फोटही राज यांनीच वैतागून केला होता.