तासगावात सुमनताई पाटील विजयी
Wednesday, April 15th, 2015सांगली, [१५ एप्रिल] – सांगलीतील तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निकालात सुमनताई पाटील यांनी १ लाख १२ हजार ९५३ मतांनी विजय मिळविला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर राष्ट्रवादीने सुमनताई यांना उमेदवारी दिली होती आणि तासगावच्या मतदारांनीही सुमनताईंवर विश्वास व्यक्त करीत त्यांना भरघोस मतदान केले.
आबांविषयी आदर राखत अन्य कोणत्याही राजकीय पक्षाने आपला उमेदवार दिला नव्हता. तथापि, भाजपाचे बंडखोर उमेदवार ऍड स्वप्नील पाटील यांच्यासह एकूण ९ अपक्ष उमेदवार या रिंगणात उतरले होते. या सर्वांचेच डिपॉझिट जप्त झाले आहे. स्वप्नील पाटील यांना केवळ १८ हजार २७३ मते मिळाली आहे. तासगाव येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या बहुउद्देशीय सभागृहात सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. मतमोजणीसाठी निवडणूक प्रशासनाने शंभरावर कर्मचारी आणि अधिकार्यांची नियुक्ती केली होती. तसेच केंद्रीय पोलिस दलाचा बंदोबस्तही त्या परिसरात ठेवण्यात आला होता.
तासगावकरांनी आपल्या लाडक्या आबांना या निकालातून आगळीवेगळी श्रद्धांजलीच वाहिली आहे.
Short URL: https://vrittabharati.in/?p=22106

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!