|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:01 | सूर्यास्त : 18:45
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.95° C

कमाल तापमान : 31.31° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 52 %

वायू वेग : 5.17 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.31° C

Weather Forecast for
Thursday, 02 May

28.06°C - 31.99°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 03 May

27.15°C - 30.32°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.49°C - 30.05°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

27.93°C - 30.82°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.45°C - 31.06°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.19°C - 30.18°C

sky is clear

कर्नाटक बंद: ४४ उड्डाणे रद्द, अनेकांना अटक

कर्नाटक बंद: ४४ उड्डाणे रद्द, अनेकांना अटकबंगळुरू, (२९ सप्टेंबर) – तामिळनाडूला कावेरी नदीचे पाणी सोडल्याच्या निषेधार्थ कर्नाटकातील कन्नड ओक्कुटा या प्रमुख संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदमध्ये शुक्रवारी बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४४ उड्डाणे रद्द करण्यात आली. माहितीनुसार, विमानतळ अधिकार्‍यांनी सांगितले की, ऑपरेशनल कारणांमुळे उड्डाणे रद्द करण्यात आली आणि प्रवाशांना वेळेत याची माहिती देण्यात आली. अनेक प्रवाशांनी तिकिटे रद्द केल्याने कर्नाटक बंदच्या प्रभावामुळे उड्डाणे रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. बंददरम्यान पाच कार्यकर्त्यांनी कर्नाटकचे झेंडे घेऊन विमानतळ परिसरात प्रवेश केल्याने...29 Sep 2023 / No Comment /

कर्नाटक सरकारच्या विरोधात भाजपसोबत आली जेडीएस

कर्नाटक सरकारच्या विरोधात भाजपसोबत आली जेडीएसबंगळुरू, (२७ सप्टेंबर) – कर्नाटकातील कावेरी पाणी वाटपावरून राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, देशाचे माजी पंतप्रधान आणि जेडीएस सुप्रीमो एचडी देवेगौडा यांनी जेडीएसच्या भाजपमध्ये प्रवेश करण्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, माजी मुख्यमंत्री बेंगळुरूमधील गांधी पुतळ्याजवळ राज्य सरकारचा निषेध करत आहेत. दुसरीकडे, एचडी कुमारस्वामी बंगळुरूमध्ये भाजपच्या निषेधात सामील झाले. मीडियाशी बोलताना माजी पंतप्रधान म्हणाले की, आतापर्यंत मी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्र्यांना भेटलो आहे. ते म्हणाले, ’गेल्या १० वर्षांत...27 Sep 2023 / No Comment /

देवेगौडा यांचा जद (सेक्युलर) रालोआत सहभागी

देवेगौडा यांचा जद (सेक्युलर) रालोआत सहभागी-कर्नाटकात भाजपाची ताकद वाढणार, नवी दिल्ली, (२३ सप्टेंबर) – पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर कर्नाटकात भाजपाची ताकद वाढणार आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा जनता दल सेक्युलर अर्थात जद एस हा पक्ष भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी झाला. स्वत: देवेगौडा यांनी शुक्रवारी याबाबतची औपचारिक घोषणा केली. पक्षाचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी भाजपाचे...23 Sep 2023 / No Comment /

समाज माध्यमाचा वापर करण्यासाठी किमान वय निश्चित करावे

समाज माध्यमाचा वापर करण्यासाठी किमान वय निश्चित करावे– कर्नाटक उच्च न्यायालयाची टिप्पणी, बंगळुरू, (२०सप्टेंबर) – समाज माध्यमाच्या वापराबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. न्यायालयाने म्हटले आहे की, दारू पिण्यासाठी विहित कायदेशीर वय असू शकते, त्याचप्रकारे समाज माध्यम वापरण्यासाठी वयोमर्यादा निश्चित केली जाऊ शकते. न्या. जी. नरेंद्र आणि न्या. विजयकुमार ए. पाटील यांच्या खंडपीठाने एकल न्यायाधीशांच्या आदेशाला आव्हान देणार्या एक्स कॉर्पच्या (पूर्वीचे ट्विटर) अपिलावर सुनावणी करताना ही टिप्पणी केली. एकल न्यायालाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या...21 Sep 2023 / No Comment /

बंगळुरू बनावट चलन प्रकरणात सहावा आरोपीही दोषी

बंगळुरू बनावट चलन प्रकरणात सहावा आरोपीही दोषी– विशेष न्यायालयाचा निर्णय, नवी दिल्ली, (१७ सप्टेंबर) – बांगलादेशातून कर्नाटकात मोठ्या प्रमाणात भारतीय चलनाच्या तस्करी प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपाखाली एनआयएच्या विशेष न्यायालयाने बंगळुरूतील एका महिला आरोपीला दोषी ठरवले आहे. वनिता उर्फ थंगम असे तिचे नाव असून, या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेली ती सहावी आरोपी आहे. न्यायालयाने तिला भादंवितील कलम ४८९-बी (बनावट नोटा अस्सल भासवून वापरणे) अंतर्गत सहा वर्षांची, कलम ४८९-सी (बनावट तोटा बाळगणे) अंतर्गत पाच वर्षांची, कलम १२०-बी (गुन्हेगारी...17 Sep 2023 / No Comment /

भाजपा-जदएस लोकसभा एकत्र लढवणार : देवेगौडा

भाजपा-जदएस लोकसभा एकत्र लढवणार : देवेगौडाबंगळुरू, (१२ सप्टेंबर) – भाजपा आणि जनता दल सेक्युलर (जदएस) यांच्यातील युतीबाबत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली चर्चा आता संपुष्टात आली आहे. जदएसचे सुप्रिमो आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी सांगितले की, भाजपा आणि जदएस एकत्र लोकसभा निवडणूक लढतील. बंगळुरूमध्ये एका कार्यक्रमात ते म्हणाले की, दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र निवडणुका लढवण्याचे मान्य केले आहे. जदएस किती जागा लढवणार, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून ठरवले जाईल. पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी...12 Sep 2023 / No Comment /

महाराष्ट्राची पुनरावृत्ती कर्नाटकात शक्य

महाराष्ट्राची पुनरावृत्ती कर्नाटकात शक्य– एच. डी. कुमारस्वामी यांचा दावा, बंगळुरू, (०५ जुलै) – महाराष्ट्रासारखीच राजकीय परिस्थिती कर्नाटकमध्येही होणार असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री आणि जदएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी केला आहे. कर्नाटकमध्येही एक अजित पवार आहेत, असा दावा त्यांनी केला. २०१९ मध्ये माझे सरकार कोसळेल, असे कुणाला वाटले नव्हते. महाराष्ट्रातही असेच झाले. महाराष्ट्रातील राजकीय हालचाली धक्कादायक आहेत. कर्नाटकमध्ये एखादा अजित पवार तयार होईल, अशी भीती आहे. असे घडायला जास्त वेळ लागणार नाही. वर्षभरात...5 Jul 2023 / No Comment /

अमित मालवीय यांच्याविरोधात एफआयआर दाखल!

अमित मालवीय यांच्याविरोधात एफआयआर दाखल!बंगळुरू, (२८ जून) – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरुद्ध वादग्रस्त ट्विट केल्याच्या आरोपावरून भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधींबद्दल ट्विट करताना भाजप आयटी सेलचे प्रमुख म्हणाले होते, ’आरजी धोकादायक आहे आणि आतला खेळ खेळत आहे. यापेक्षा धोकादायक ते लोक आहेत, जे सॅम पी सारख्या रागातून भारताविरुद्ध कट्टरता पसरवत आहेत. असे लोक पंतप्रधान मोदींना लाजवण्यासाठी म्हणून परदेशात त्यांची बदनामी करण्यात कोणतीही कसर...28 Jun 2023 / No Comment /

कर्नाटकात धर्मांतरविरोधी कायदा रद्द!

कर्नाटकात धर्मांतरविरोधी कायदा रद्द!नवी दिल्ली, (१५ जून) – कर्नाटक सरकारने भाजपने आणलेला धर्मांतरविरोधी कायदाही मागे घेतला आहे. त्याचबरोबर पाठयपुस्तकातून हेडगेवार आणि सावरकरांची प्रकरणे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपने केलेल्या बदलांना सुरुवात झाली आहे. शालेय पुस्तकांमध्ये बदल करण्याचा निर्णय कर्नाटक मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला. मागील भाजप सरकारने पुस्तकांमध्ये समाविष्ट केलेले प्रकरण आता काढून टाकले जाणार आहेत. त्याचबरोबर भाजप सरकारने आणलेला धर्मांतरविरोधी कायदाही मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. राज्यघटनेची...15 Jun 2023 / No Comment /

कर्नाटकात कत्तल प्रतिबंधक, गोवंश संरक्षण कायदा मागे?

कर्नाटकात कत्तल प्रतिबंधक, गोवंश संरक्षण कायदा मागे?बंगळुरू, (४ जून) – कर्नाटकात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. पशुसंवर्धन मंत्री टी. व्यंकटेश यांनी कत्तल प्रतिबंधक आणि गोवंश संरक्षण कायदा मागे घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तसे झाल्यास कर्नाटकातील भाजप सरकारने आणलेला गोहत्याबंदी कायदाही संपुष्टात येईल. यानंतर गायींची हत्या हा गुन्हा राहणार नाही. कर्नाटकचे पशुसंवर्धन मंत्री टी. व्यंकटेश यांनी शनिवारी मोठे विधान केले. ते म्हणाले, म्हशी, बैल कापता येतात तर गायी का नाही. गोहत्या प्रतिबंधक...4 Jun 2023 / No Comment /

५ वर्षे सिद्धरामय्याच मुख्यमंत्री; सत्तावाटपाचा करार नाही

५ वर्षे सिद्धरामय्याच मुख्यमंत्री; सत्तावाटपाचा करार नाहीनवी दिल्ली, (२३ मे) – कर्नाटकचे मंत्री एम बी पाटील यांनी सिद्धरामय्या यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, सिद्धरामय्याच पाच वर्षे कर्नाटकचे मुख्यमंत्री राहतील. पाटील म्हणाले की, अडीच वर्षांचा कोणताही फॉर्म्युला काँग्रेस हायकमांडने ठरवलेला नाही. शनिवारी सिद्धरामय्या आणि डीके यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एम.बी.पाटील म्हणाले की, आमच्या माहितीनुसार सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात पक्षाच्या हायकमांडमध्ये सत्तावाटपाचा कोणताही करार झालेला नाही. जर अशी योजना असती तर...23 May 2023 / No Comment /

सिद्धरामय्या यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ!

सिद्धरामय्या यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ!बंगळुरू, (२० मे) – कर्नाटकात आज सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाची तर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याशिवाय अनेक आमदारांनाही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा बेंगळुरूच्या कांतीराव स्टेडियमवर पार पडला. कर्नाटकात नवे सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यासह ८ मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. शपथविधी समारंभानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित जनतेला संबोधित करताना काँग्रेसचे सरकार स्थापन केल्याबद्दल कर्नाटकातील जनतेचे आभार मानले....20 May 2023 / No Comment /