किमान तापमान : 26.49° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 36 %
वायू वेग : 3.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
24.27°से. - 28.14°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.05°से. - 28.38°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.28°से. - 28.24°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.41°से. - 27.68°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.18°से. - 27.95°से.
रविवार, 01 डिसेंबर कुछ बादल23.02°से. - 26.24°से.
सोमवार, 02 डिसेंबर टूटे हुए बादलबंगळुरू, (४ जून) – कर्नाटकात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. पशुसंवर्धन मंत्री टी. व्यंकटेश यांनी कत्तल प्रतिबंधक आणि गोवंश संरक्षण कायदा मागे घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तसे झाल्यास कर्नाटकातील भाजप सरकारने आणलेला गोहत्याबंदी कायदाही संपुष्टात येईल. यानंतर गायींची हत्या हा गुन्हा राहणार नाही. कर्नाटकचे पशुसंवर्धन मंत्री टी. व्यंकटेश यांनी शनिवारी मोठे विधान केले. ते म्हणाले, म्हशी, बैल कापता येतात तर गायी का नाही. गोहत्या प्रतिबंधक आणि गोवंश संरक्षण कायदा परत आणण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे ते म्हणाले. शेतकर्यांसाठी याचा खूप फायदा होणार आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या मंत्र्याच्या वक्तव्याचा भाजप समर्थकांनी निषेध केला आहे. गोहत्येवरील कायदा मागे घेतल्यास परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. यापूर्वीच्या भाजप सरकारने गोहत्या बंदी आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षेची तरतूद करणारे विधेयक मंजूर केले होते. हा हिंदूंचा अपमान असल्याचा आरोप भाजपने केला आहे. एका वर्गाला खूश करण्यासाठी काँग्रेस सरकार अशा घोषणा करत आहे. यापूर्वी बजरंग दलावर बंदीच्या घोषणेवरून गदारोळ झाला होता. व्यंकटेश यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी राहत्या घरी तीन ते चार गायी पाळल्या. पण, यापैकी एक गाय मरण पावल्यावर तिच्या अंतिम संस्कारासाठी मला खूप संघर्ष करावा लागला. सुमारे २५ जण त्याला उचलण्यासाठी आले, मात्र तरीही त्यांना उचलता आले नाही. नंतर ते जेसीबीच्या साहाय्याने उचलता आले. ते म्हणाले की, राज्यातील गोशाळांच्या व्यवस्थापनासाठी निधीची कमतरता आहे. मात्र त्यांचा या विधानाने चांगलीच खळबळ उडाली आहे.