किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– बचाव व मदत कार्यात दिले झोकून,
– जखमी प्रवाशांसाठी केले रक्तदान,
– ओडिशा रेल्वे अपघात,
भुवनेश्वर, (३ जून) – बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर नेहमीप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक प्रथम घटनास्थळी पोहोचले. प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचण्याआधीच म्हणजेच सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास स्वयंसेवक अपघातस्थळी पोहोचले होते. दुर्घटना स्थळाजवळील गावात संघ शाखा असल्याने सुरुवातीला अत्यल्प संख्येने स्वयंसेवक पोहोचले होते, मात्र रात्री उशिरापर्यंत सुमारे अडीचशे स्वयंसेवकांनी अपघातस्थळी पोहोचून प्रशासन व मदतकार्यात गुंतलेल्या जवानांना मदत केली.
रा. स्व. संघाचे प्रांत प्रचार प्रमुख रवी नारायण पंंडा यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी प्रशासन आणि बचाव कार्यात गुंतलेल्या विविध यंत्रणांच्या जवानांसह अपघातग्रस्त गाड्यांमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात मदत केली. संघाचे सहविभाग प्रचारक विष्णू नायक देखील दुर्घटनास्थळी उपस्थित होते. संघाच्या स्वयंसेवकांनी गाडीत अडकलेल्या जखमी प्रवाशांची सुटका करण्यासोबतच त्यांना रुग्णवाहिकेत बसविण्यापर्यंतच्या विविध कामांत मदत केली. जखमी प्रवाशांना रुग्णालयात नेल्यानंतर बालासोर विभागाचे प्रचारक चंद्रशेखर महापात्रा यांनी बालासोर येथील जिल्हा मुख्यालय रुग्णालयात उपस्थित राहून तेथील सेवा कार्यावर देखरेख केली.
गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना रक्ताची गरज भासली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संघाच्या स्वयंसेवकांनी जखमी प्रवाशांसाठीही रक्तदान केले. तसेच काही जखमी प्रवाशांना भद्रक जिल्हा मुख्यालय रुग्णालयात आणि सोरो येथील मेडिकलमध्ये नेण्यात आले. भद्रक जिल्हा मुख्यालय रुग्णालयात हिंदू जागरण मंचचे कार्यकर्ते रात्रभर व नंतरही जखमींना मदत करत होते. सोरो मेडिकलमध्येही संघाच्या ४० स्वयंसेवकांनी आघाडी सांभाळली. या रुग्णालयांमध्येही स्वयंसेवकांनी रक्तदान केले तसेच अन्य जखमी प्रवाशांसाठी रक्त उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली. यासोबतच जखमींच्या नातेवाईकांशी संपर्क साधून माहिती देण्याच्या कामातही ते मग्न होते. अपघातस्थळी रात्रभर स्वयंसेवक बचाव कार्यात सहभागी झाले होते.
अपघातात जीव गमावलेल्या प्रवाशांचे मृतदेह स्वीकारण्यास आलेल्या नातेवाईकांना मदत करण्यातही शनिवार सकाळपासूनच स्वयंसेवक गुंतले होते. त्याचप्रमाणे कटकच्या एससीबी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात संघाच्या सेवा विभागाशी संबंधित स्वयंसेवक कार्यरत होते. या जखमी प्रवाशांना परिचर देण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना माहिती देण्याच्या कामातही स्वयंसेवक गुंतले होते. संघाचे क्षेत्रीय सेवा प्रमुख जगदीश खाडंगा आणि प्रांत सेवा प्रमुख शंतनू माझी हे देखील अपघातस्थळी उपस्थित होते व त्यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली हे मदत व बचाव कार्य करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे हेल्पलाईन क्रमांकही सुरू करण्यात आला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनीही रक्तदान केले.