किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती,
बालासोर, (३ जून) – ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील तिहेरी रेल्वे अपघातानंतरचे बचावकार्य पूर्ण झाले आहे. आम्ही या घटनेची सखोल चौकशी करू आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घेऊ, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. ओडिशातील भीषण रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २३३ झाली असून, ९०० जण जखमी आहेत. घटनास्थळी बचावकार्य पूर्ण झाले आहे, अशी माहिती दक्षिण पूर्व रेल्वेच्या अधिकार्याने शनिवारी दिली.
ओडिशातील रेल्वे अपघाताच्या ठिकाणी वैद्यकीय मदतीसाठी भुवनेश्वरमधील एम्स डॉक्टरांची दोन पथके बालासोर आणि कटकसाठी रवाना करण्यात आली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी ट्विट करीत सांगितले आहे. कोलकात्यापासून दक्षिणेस सुमारे २५० किमी आणि भुवनेश्वरपासून उत्तरेस १७० किमी अंतरावर बालासोर जिल्ह्यातील बहनागा बाजार स्थानकाजवळ शुक‘वारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास हा भीषण रेल्वे अपघात झाला. रेल्वे अपघाताची चौकशी दक्षिण पूर्व सर्कलचे सुरक्षा आयुक्त ए. एम. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली केली जाईल, असे भारतीय रेल्वेने एका निवेदनात म्हटले आहे. १२८६४ बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेसचे अनेक डबे हावडा मार्गावर रुळावरून घसरले आणि लगतच्या रुळांवर पडले, अशी माहिती एका अधिकार्याने दिली. या रुळावरून घसरलेल्या डब्यांना १२८४१ शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्सप्रेस धडकली आणि तिचेही डबे उलटले, असे सांगण्यात आले. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख, गंभीर जखमींना दोन लाख आणि किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.
भीषण रेल्वे अपघात; पण, या ११० जणांच्या केसालाही धक्का नाही
ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेमुळे झालेला विध्वंस संपूर्ण देशाने पाहिला. या अपघातग्रस्त रेल्वेत कर्नाटकातील ११० जण प्रवास करत होते, आणि त्यापैकी कोणाच्याही केसलाही धक्का लागला नाही. बालासोरमध्ये तीन गाड्यांच्या धडकेने हा अपघात झाला. यामध्ये दोन पॅसेंजर ट्रेन, कोरोमंडल एक्सप्रेस आणि बेंगळुरू हावडा ट्रेन आणि एक मालगाडी यांचा समावेश होता.
या अपघातातून बचावलेले सर्व ११० प्रवासी बेंगळुरू-हावडा ट्रेनमध्ये प्रवास करत होते. हे सर्व लोक चिक्कमगलुरु जिल्ह्यातील कलसा तालुक्यातील रहिवासी आहेत. ते ट्रेनच्या ड५, ड६ आणि ड७ क्रमांकाच्या बोगीतून प्रवास करत होते. अपघातापूर्वी कोलकात्याजवळ रेल्वेचे इंजिन बदलण्यात आले होते. त्यामुळे सर्व प्रवाशांना रेल्वेच्या पहिल्या डब्यात हलवण्यात आले. ट्रेनला अपघात झाला तेव्हा त्याचे शेवटचे चार डबे रुळावरून घसरले. हे ११० प्रवासी पहिल्या डब्यात होते त्यामुळे ते वाचले. मिळालेल्या माहितीनुसार, या ट्रेनमध्ये एकूण १२९४ प्रवासी प्रवास करत होते. बालासोरच्या बहनमा येथे ही घटना घडली. बालासोर रेल्वे अपघातात आतापर्यंत २८० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून ९०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.