|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 22.99° से.

कमाल तापमान : 24.08° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 56 %

वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

22.99° से.

हवामानाचा अंदाज

22.99°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.53°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल
Home » ओडिशा, राज्य » अपघातातील दोषींना कठोर शिक्षा केली जाईल : मोदी

अपघातातील दोषींना कठोर शिक्षा केली जाईल : मोदी

– पंतप्रधानांनी घेतला अपघातस्थळाचा आढावा, जखमींची भेट,
बालासोर, (३ जून) – पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताच्या ठिकाणी पोहोचले. शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ लोकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे उघड झाले आहे. पंतप्रधानांनी रेल्वे अपघातस्थळी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवही उपस्थित आहेत. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींसह रेल्वेचे सर्व उच्चपदस्थ अधिकारीही घटनास्थळी उपस्थित आहेत. यांनतर पीएम मोदी कटक येथे अपघातात जखमी झालेल्या लोकांना भेटले.
अपघातातील जखमींना भेटल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, सर्वतोपरी चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा केली जाईल. या अपघातात आपल्या श्रमपूर्वक प्रयत्नातून स्थानिक राज्य सरकार त्यांना उपलब्ध असलेल्या संसाधनाच्या सहकार्याने करत असलेल्या मदतीसाठी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर स्थानिक नागरिकांचेही आभार व्यक्त करतो. ते परिस्थीतीला समजून रक्तदान करण्यासाठी त्याचबरोबर बचाव कार्यासाठी पुढे आले. त्यामुळे बचावकार्य जलदगतीने होऊ शकलं. त्यासाठी त्यांच्यातील सहृदयता आभारास पात्र आहे. या घटनांपासून आम्ही खूप काही शिकू आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करू. परिवारजनांच्या स्वास्थ्यासाठी सरकारच्या वतीने सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. जखमींशी बोलल्यानंतर मी निःशब्ध झालेलो आहे.
पंतप्रधान मोदींनी प्रथम घटनास्थळी परिस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक अधिकारी, मदत आणि बचाव कार्यात असलेले लोक आणि रेल्वे अधिकार्‍यांशी चर्चा केली. या शोकांतिकेला तोंड देण्यासाठी सरकारच्या पूर्णपणे एकत्रित दृष्टिकोनावर पंतप्रधानांनी भर दिला. पंतप्रधान मोदींनी कॅबिनेट सचिव आणि आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी घटनास्थळावरून फोनवर बोलले. जखमींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत करण्यात यावी, असे पंतप्रधान म्हणाले. दुःखाचा सामना करणार्‍या कुटुंबांची विशेष काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. ज्यांना त्रास होतो त्यांचीही काळजी घेतली पाहिजे. घटनास्थळावरील व्हिडिओमध्ये पंतप्रधान रेल्वे अधिकार्‍यांमार्फत काही फाइल्स दाखवताना दिसत होते.
यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी बालासोर वैद्यकीय महाविद्यालयात जखमींना भेटले. बालासोरला येण्यापूर्वी पीएम मोदींनी दिल्लीत बैठक बोलावली. या बैठकीत ओडिशातील रस्ते अपघाताच्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. अपघातात प्राण गमावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात येणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, या रेल्वे अपघातात आपल्या राज्यातील लोकांना ५ लाख रुपये दिले जातील. बचावकार्य पूर्ण झाल्याचे रेल्वेने सांगितले आहे. भारतातील सध्याच्या रेकॉर्डनुसार हा रेल्वे अपघात चौथा सर्वात भीषण अपघात आहे. बालासोर जिल्ह्यातील बहंगा बाजार स्थानकाजवळ शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा रेल्वे अपघात झाला.
सध्या या अपघातासंदर्भातील संपूर्ण माहिती घेतली जात आहे. तिन्ही गाड्या एकमेकांवर कशा आदळल्या याचा तपास सुरू आहे. भारतीय रेल्वेने एका निवेदनात म्हटले आहे की, रेल्वे अपघाताचा तपास दक्षिण पूर्व सर्कलमधील रेल्वे सुरक्षा आयुक्त ए.एम. चौधरी यांच्याकडे देण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्त नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. ओडिशातील या रेल्वे अपघातात तीन गाड्यांचा समावेश आहे. चेन्नईला जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावरून घसरून पुढे उभ्या असलेल्या मालगाडीला धडकल्याने हा अपघात झाला. यामुळे कोरोमंडल एक्स्प्रेसचे मागील डबे तिसर्‍या ट्रॅकवर पोहोचले. त्याचवेळी पलीकडून येणारी बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस रुळावरून घसरलेल्या बोगींवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की मालगाडीच्या बोगीवर चढताना दिसत होते. एनडीआरएफच्या टीमने गॅस कटर आणि इलेक्ट्रिक कटरच्या मदतीने बोगी कापून अडकलेल्या लोकांना बाहेर काढले.

Posted by : | on : 3 Jun 2023
Filed under : ओडिशा, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g