|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.16° C

कमाल तापमान : 32.71° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 73 %

वायू वेग : 5.58 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.71° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.13°C - 33.99°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 20 May

29.26°C - 31.36°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.9°C - 30.93°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.73°C - 29.71°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.77°C - 29.73°C

light rain
Weather Forecast for
Friday, 24 May

28.7°C - 29.89°C

light rain

मध्यप्रदेशात भाजपाच्या जन आशीर्वाद रॅलीवर हल्ला

मध्यप्रदेशात भाजपाच्या जन आशीर्वाद रॅलीवर हल्ला– हल्लेखोर काँग्रेसशी संबंधित असल्याचा आरोप, भोपाळ, (०६ सप्टेंबर) – मध्यप्रदेशातील नीमच जिल्ह्यात भाजपाच्या जन आशीर्वाद रॅलीवर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी बुधवारी दिली. हल्लेखोर काँग्रेसशी संबंधित असल्याचा आरोप त्यांनी केला. नीमच जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी हा हल्ला करण्यात आला आणि या यात्रेत सहभागी असलेल्या वाहनांची तोडफोड केली, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा यांनी यापूर्वी केला. काँग्रेसने भाजपाचे...6 Sep 2023 / No Comment /

एडिटर्स गिल्डच्या सदस्यांविरोधात मणिपुरात एफआयआर

एडिटर्स गिल्डच्या सदस्यांविरोधात मणिपुरात एफआयआर– संघर्ष भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप, इम्फाळ, (०४ सप्टेंबर) – मणिपुरात संघर्ष भडकवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाचे (ईजीआय) अध्यक्ष आणि तीन सदस्यांविरोधात सरकारे एफआयआर दाखल केल्याची माहिती मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेनसिंह यांनी सोमवारी दिली. राज्यात कित्येक जण ठार आणि बेघर झाले असताना, अडचणी तसेच राज्याचा इतिहास जाणून न घेता ईजीआयने एकतर्फी वृत्त प्रकाशित केले, असे सिंह यांनी पत्रपरिषदेत सांगितले. एडिटर गिल्डने मागील आठवड्यात प्रकाशित केलेल्या एका वृत्तात...4 Sep 2023 / No Comment /

मेट्रो स्टेशन ८-१० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार

मेट्रो स्टेशन ८-१० सप्टेंबरपर्यंत बंद राहणारनवी दिल्ली, (०४ सप्टेंबर) – नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर विशाल भारत मंडपम येथे होणार्‍या उच्चस्तरीय जी२० शिखर परिषदेच्या आधी, दिल्ली मेट्रोने प्रवाशांसाठी एक सल्ला जारी केला आहे. दिल्ली मेट्रो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८-१० सप्टेंबरपर्यंत काही संवेदनशील स्थानकांचे प्रवेश आणि एक्झिट गेट बंद राहतील. या कालावधीत, प्रवासी काही स्थानकांवर एक किंवा दोन गेट वापरणे सुरू ठेवू शकतात, तर इतर मार्ग नेहमीप्रमाणे सुरू राहतील. ९ ते १० सप्टेंबर या कालावधीत दिल्लीत होणार्‍या...4 Sep 2023 / No Comment /

आकाशातून मृत्यूचा पाऊस, २ तासात ६२३५० वेळा वीज कोसळली

आकाशातून मृत्यूचा पाऊस, २ तासात ६२३५० वेळा वीज कोसळली-अनेकांना गमवला जीव, भुवनेश्वर, (०४ सप्टेंबर) – ओडिशा सरकारने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दिवसात राज्यात वीज पडून मृतांची संख्या १२ झाली आहे. याशिवाय, सरकारने प्रत्येक पीडितेच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. विशेष मदत आयुक्त कार्यालयानुसार, सर्व जिल्ह्यांमध्ये वीज पडून मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे: खुर्दामध्ये चार, बोलंगीरमध्ये दोन आणि अंगुल, बौद्ध, गजपती, जगतसिंगपूर, ढेंकनाल आणि पुरी येथे प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे. एका अहवालानुसार, शनिवारी सुमारे दोन...4 Sep 2023 / No Comment /

धीरेंद्र शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी

धीरेंद्र शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकीबरेली, (०४ सप्टेंबर) – उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये अनस अन्सारी नावाच्या तरुणाने बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हे प्रकरण हाफिजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिठोरा येथील आहे. आरोपीने इंस्टाग्रामवर धमकीचे संदेश पाठवले होते. त्यांनी लिहिलंय की बाबांचा मृत्यू जवळ आला आहे. त्यांच्या मेसेजचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांना धमकी दिल्याची कबुली दिली आहे. आरोपीने इंस्टाग्रामवर धमकीचे...4 Sep 2023 / No Comment /

जन्माष्टमीला योगी सरकार काढणार शोभायात्रा

जन्माष्टमीला योगी सरकार काढणार शोभायात्रामथुरा, (०४ सप्टेंबर) – आतापर्यंत रामनवमीला शोभायात्रेची प्रथा देशभरात पाळली जाते. मात्र, योगी सरकारने यंदा प्रथमच जन्माष्टमीनिमित्त शोभायात्रा काढण्याचे ठरविले आहे. मथुरेत यंदा जन्माष्टमीला भव्य आयोजन होईल. वस्तुत: सप्टेंबरला श्रीकृष्णाचा ५२५० वा जन्मदिन आहे. ६ सप्टेंबरपासून सुरू होणारे कार्यक‘म ८ सप्टेंबरपर्यंत चालतील. ७ सप्टेंबरला तीन किमी लांब भव्य शोभायात्रा निघेल. यात ५० लाख भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. शोभायात्रा सकाळी आठ वाजता श्रीकृष्ण जन्मस्थळाची प्रदक्षिणेने सुरू होईल. मथुरा-वृंदावन हॉटेल संघटनेचे...4 Sep 2023 / No Comment /

राजस्थानसारख्या राज्यात निधीचा योग्य वापर केलेला नाही

राजस्थानसारख्या राज्यात निधीचा योग्य वापर केलेला नाही– अमित शाह गहलोतांवर कडाडले, डुंगरपूर, (०३ सप्टेंबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रातून राज्याकडे आवश्यक तो सर्व निधी व्यवस्थित पाठवतात. मात्र, राजस्थानसारख्या राज्यात या निधीचा योग्य वापर केलेला नाही. मी बनियाचा मुलगा आहे, त्यामुळे हिशेब घेऊनच आलो आहे. पाच वर्षांत तुम्ही काय केले ते जाहीरपणे सांगा, असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे. शाह रविवारी डुंगरपूर येथे बोलत होते. राजस्थानमध्ये भाजपाच्या दुसर्या परिवर्तन यात्रेचा शुभारंभ करण्यासाठी अमित शाह...3 Sep 2023 / No Comment /

गांधी परिवारासाठी छत्तीसगडला बनवले एटीएम: अमित शाह

गांधी परिवारासाठी छत्तीसगडला बनवले एटीएम: अमित शाह– बघेल यांच्याविरुद्ध भाजपाचे आरोपपत्र, रायपूर, (०२ सप्टेंबर) – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी छत्तीसगडमधील भूपेश बघेल सरकारच्या विरोधात आरोपपत्र जारी केले. यात लूट, घोटाळे करून राज्यातील नागरिकांवर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. येथे वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणूक होणार आहेत. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी छत्तीसगडला गांधी परिवाराचे एटीएम केल्याचा आरोप शाह यांनी केला. राज्य सरकारने भ्रष्टाचाराचे सर्व रेकॉर्ड्स तोडल्याचा दावा त्यांनी केला. छत्तीसगड सरकार केवळ मतपेटीच्या राजकारणासाठी आदिवासी भागातील...3 Sep 2023 / No Comment /

‘ज्ञानवापी’वर पुरातत्त्व विभागाने मागितली मुदतवाढ

‘ज्ञानवापी’वर पुरातत्त्व विभागाने मागितली मुदतवाढवाराणसी, (०२ सप्टेंबर) – ज्ञानवापी मशिदीचा सर्वेक्षण अहवाल सादर करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने आठ आठवड्यांचा कालावधी मागितला आहे. या प्रकरणी ८ सप्टेंबर रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा अर्ज न्यायालय स्वीकारणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुरातत्त्व विभागाच्या वतीने युक्तिवाद करताना अमित श्रीवास्तव, सुभाष नंदन चतुर्वेदी, सोहनलाल यांनी न्या. संजीव सिन्हा यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला. वकिलाच्या मृत्युमुळे न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी ४...3 Sep 2023 / No Comment /

‘लिव्ह इन’ म्हणजे विवाह संस्था संपविण्याचा सुनियोजित कट

‘लिव्ह इन’ म्हणजे विवाह संस्था संपविण्याचा सुनियोजित कट– अलाहबाद उच्च न्यायालयाचे निरीक्षण, लखनौ, (०२ सप्टेंबर) – विवाहसंस्थेत असणारे स्थैर्य आणि सुरक्षितता यांची अपेक्षा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये करता येणार नाही. लिव्ह इन एक प्रकारे विवाहसंस्था संपवण्याचा सुनियोजित कट आहे, असे निरीक्षण अलाहबाद उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. उत्तरप्रदेशातील सहारनपूर येथील एका युवकावर लिव्ह इन पार्टनरने बलात्काराची तक्रार केली. त्या आधारे दाखल गुन्ह्यात जामीन देताना उच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. याबाबतचा निकाल न्या. सिद्धार्थ यांनी दिला. भारतातील विवाहसंस्था संपवण्याचा सुनियोजित...3 Sep 2023 / No Comment /

पन्नूची मुख्यमंत्री भगवंत मान यांना धमकी

पन्नूची मुख्यमंत्री भगवंत मान यांना धमकीचंदिगढ, (०१ सप्टेंबर) – सध्या गुगलवर पंजाबमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी मानवी बॉम्ब आणि मारेकरी तयार करण्यासाठी एक अ‍ॅप बनवले जात आहे. परदेशी भूमीवर विकसित होणार्‍या या अ‍ॅपचे नावही ठेवण्यात आले आहे. पंजाबचे वातावरण बिघडवण्याचा हा कट खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू आणि त्याची संघटना शिख फॉर जस्टिसने रचला आहे. एवढेच नाही तर पन्नूने ३१ ऑगस्टला पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांच्या पुण्यतिथीला ही घोषणा केली. दरम्यान, पन्नू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री...1 Sep 2023 / No Comment /

नूह हिंसाचारामागे काँग्रेसचा हात?

नूह हिंसाचारामागे काँग्रेसचा हात?चंदीगड, (२९ ऑगस्ट) – ३१जुलै रोजी मुस्लिम जमावाने नूह येथे हिंदूविरोधी हिंसाचार केल्याप्रकरणी फिरोजपूरचे काँग्रेस आमदार झिरका मम्मन खान यांच्याविरुद्ध पुरावे सापडले असल्याचे हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी राज्य विधानसभेत सांगितले. विज म्हणाले की, आतापर्यंतच्या तपासाच्या आधारे पुरावे काँग्रेसच्या भूमिकेकडे निर्देश करतात. काँग्रेस आमदार मम्मन खान यांना सीआरपीसीच्या कलम १६० अंतर्गत नोटीस बजावल्याच्या एका दिवसानंतर गृहमंत्र्यांचे विधान आले आहे, त्यांना तपासात सामील होण्यास आणि नगीना पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले...29 Aug 2023 / No Comment /