किमान तापमान : 27.32° से.
कमाल तापमान : 27.98° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 3.39 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
26.99°से. - 29.5°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 30.84°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.76°से. - 30.97°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27°से. - 30.63°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.46°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल26.12°से. - 29.61°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश– अलाहबाद उच्च न्यायालयाचे निरीक्षण,
लखनौ, (०२ सप्टेंबर) – विवाहसंस्थेत असणारे स्थैर्य आणि सुरक्षितता यांची अपेक्षा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये करता येणार नाही. लिव्ह इन एक प्रकारे विवाहसंस्था संपवण्याचा सुनियोजित कट आहे, असे निरीक्षण अलाहबाद उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. उत्तरप्रदेशातील सहारनपूर येथील एका युवकावर लिव्ह इन पार्टनरने बलात्काराची तक्रार केली. त्या आधारे दाखल गुन्ह्यात जामीन देताना उच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. याबाबतचा निकाल न्या. सिद्धार्थ यांनी दिला.
भारतातील विवाहसंस्था संपवण्याचा सुनियोजित कट आहे, असे दिसते. हंगामानुसार जोडीदार बदलण्याची पद्धत स्थिर आणि सुदृढ समाजाचे लक्षण असू शकत नाही, असे न्या. सिद्धार्थ म्हणाले. या खटल्यातील युवक आणि युवती लिव्ह इनमध्ये राहत होती, त्यातून युवतीला गर्भधारणा झाली. युवकाने लग्नाला नकार दिल्यानंतर युवतीने बलात्काराची तक्रार दाखल केली. त्यानंतर युवकाला अटक करण्यात आली.
कथित विकसित देश आता लग्न व्यवस्था टिकवण्यासाठी झगडत आहे. मात्र, लिव्ह इनचा ट्रेंड आपल्या देशात भविष्यात मोठी समस्या निर्माण करू शकतो. लग्नातील किंवा लिव्ह इनमधील व्यभिचार हे आधुनिक समाजाचे लक्षण बनत चालले आहे. भविष्यात काय परिणाम होईल, याचा विचार न करताच तरुण पिढी याकडे आकर्षित होत आहे, असे न्या. सिद्धार्थ म्हणाले.