किमान तापमान : 26.99° से.
कमाल तापमान : 27.98° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.39 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.99°से. - 29.5°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 30.84°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.76°से. - 30.97°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.93°से. - 30.63°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.46°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल26.12°से. - 29.61°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाशवाराणसी, (०२ सप्टेंबर) – ज्ञानवापी मशिदीचा सर्वेक्षण अहवाल सादर करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने आठ आठवड्यांचा कालावधी मागितला आहे. या प्रकरणी ८ सप्टेंबर रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा अर्ज न्यायालय स्वीकारणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुरातत्त्व विभागाच्या वतीने युक्तिवाद करताना अमित श्रीवास्तव, सुभाष नंदन चतुर्वेदी, सोहनलाल यांनी न्या. संजीव सिन्हा यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला. वकिलाच्या मृत्युमुळे न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी ४ सप्टेंबर रोजी ठेवली आहे.
सीलबंद गोदाम वगळता ज्ञानवापी परिसराचे सर्वेक्षण करून २ सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हा न्यायाधीश न्यायालयाने दिला होता. पुरातत्त्व विभागाचे पथक येथे ४ ऑगस्टपासून सर्वेक्षण करीत आहे. यात जीपीआर तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे. ज्ञानवापीमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. त्यामुळे न्यायालयात आज अहवाल दाखल होण्याची अरेक्षा नव्हती. आता अर्जाच्या आधारे न्यायालय आदेश देणार आहे. केंद्र सरकारच्या वतीने वकील अमित श्रीवास्तव यांनी सांगितले की, सध्या ज्ञानवापीचे सर्वेक्षण सुरू आहे.