किमान तापमान : 29.2° से.
कमाल तापमान : 29.63° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 2.05 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.2° से.
27.37°से. - 29.77°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.47°से. - 31.24°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.29°से. - 31.41°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.45°से. - 30.88°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.91°से. - 30.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.48°से. - 30.03°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश– बघेल यांच्याविरुद्ध भाजपाचे आरोपपत्र,
रायपूर, (०२ सप्टेंबर) – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी छत्तीसगडमधील भूपेश बघेल सरकारच्या विरोधात आरोपपत्र जारी केले. यात लूट, घोटाळे करून राज्यातील नागरिकांवर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. येथे वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणूक होणार आहेत. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी छत्तीसगडला गांधी परिवाराचे एटीएम केल्याचा आरोप शाह यांनी केला. राज्य सरकारने भ्रष्टाचाराचे सर्व रेकॉर्ड्स तोडल्याचा दावा त्यांनी केला.
छत्तीसगड सरकार केवळ मतपेटीच्या राजकारणासाठी आदिवासी भागातील धर्मांतरण रोखत नसल्याचा आरोप अमित शाह यांनी केला. छत्तीसगडमधील कोळसा, दारू, ऑनलाईन सट्टा अशा कित्येक घोटाळ्यांचा तपास सध्या केंद्रीय तपास यंत्रणा करीत आहेत. काँग्रेसच्या भ्रष्टाचार, घोटाळे, अत्याचार आणि गैर-शासनापासून केवळ भाजपाच छत्तीसगडला वाचवू शकते, असे आळीं डहरह शाह यांनी सांगितले.
‘महादेव ऑनलाईन बुक’ या बेकायदेशीर बेटिंग अॅपशी संबंधित बेकायदेशीर सावकारी प्रकरणाचा संदर्भ देताना शाह म्हणाले की, छत्तीसगडच्या लोकांनी, तरुणांनी ऑनलाईन बेटिंगकडे ढकलणारे बघेल सरकार हवे की, युवकांच्या विकासासाठी काम करणारे भाजपा सरकार, हे ठरवावे. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावणारे बघेल सरकार हवे की विकासाच्या मार्गावर चालणारे भाजपा सरकार, हे छत्तीसगडच्या लोकांना ठरवावे लागेल.
भ्रष्टाचार्यांना उलटे टांगले जाईल
बघेल यांच्या नेतृत्वातील सरकारने भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मोडले आहेत. भाजपा सत्तेत आल्यास भ्रष्टाचारात गुंतलेल्यांना उलटे टांगले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील राओला सरकार केंद्रात पुन्हा सत्तेत येईल आणि त्यापूर्वी छत्तीसगडमध्ये भाजपा पूर्ण बहुमताने निवडून येईल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.