किमान तापमान : 29.81° से.
कमाल तापमान : 29.93° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 4.76 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.93° से.
27.3°से. - 30°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.85°से. - 31.56°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.12°से. - 31.57°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 30.38°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.74°से. - 30.38°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.37°से. - 29.74°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल– अमित शाह गहलोतांवर कडाडले,
डुंगरपूर, (०३ सप्टेंबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रातून राज्याकडे आवश्यक तो सर्व निधी व्यवस्थित पाठवतात. मात्र, राजस्थानसारख्या राज्यात या निधीचा योग्य वापर केलेला नाही. मी बनियाचा मुलगा आहे, त्यामुळे हिशेब घेऊनच आलो आहे. पाच वर्षांत तुम्ही काय केले ते जाहीरपणे सांगा, असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे. शाह रविवारी डुंगरपूर येथे बोलत होते.
राजस्थानमध्ये भाजपाच्या दुसर्या परिवर्तन यात्रेचा शुभारंभ करण्यासाठी अमित शाह डुंगरपूरला पोहोचले. शाह यांनी मंचावरून राजस्थानच्या काँग्रेस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. एकीकडे त्यांनी वसुंधरा राजे यांचे कौतुक केले तर, दुसरीकडे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या जातीयवादी धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शाह म्हणाले, गहलोत साहेब, तुम्ही तुमच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात काय केले, याचा हिशेब पत्रकार परिषदेत द्या, असे मी आव्हान देतो. वागद भागातील सर्व मंदिरांमधून आम्हाला आशीर्वाद मिळत राहतात. राजस्थानमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी परिवर्तन यात्रा काम करेल. परिवर्तन यात्रेचा टप्पा पूर्ण झाल्यावर गहलोत सरकारची हकालपट्टी होईल.
संपुआ सरकारने १० वर्षे राजस्थानला काय दिले, असा सवाल अमित शाह यांनी मुख्यमंत्री गहलोत यांना केला. त्यांनी गहलोत यांच्यावर हल्ला चढवत, मी एका व्यापार्याचा मुलगा असून, पूर्ण हिशेब घेऊन आलो आहे, असे ठणकावले. राजस्थानच्या विकासाच्या मुद्यावर अमित शाह मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची जोरदार कोंडी करताना दिसले. मोदी सरकारने राजस्थानमध्ये केलेल्या विकासकामांचीही शाह यांनी यादी वाचली. ८०,००० शेतकर्यांच्या खात्यात थेट निधी जमा करण्यासारखे अनेक मुद्दे त्यांनी जनतेसमोर ठेवले.
मोदीजी पैसे पाठवतात; पण गेहलोत सरकार घोटाळेबाज
जल जीवन मिशन योजनेतील घोटाळ्यावरून अमित शाह यांनी मुख्यमंत्री गहलोत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, मोदीजी पैसे पाठवतात पण गहलोत त्यात घोटाळा करीत आहेत. मोदी सरकारने लोकांना कोरोना विरुद्ध लसीकरण मोफत दिले. गहलोत जी, मी केंद्र सरकारच्या नऊ वर्षांच्या कामाचे रिपोर्ट कार्ड सादर करू शकतो, तुम्ही काय करू शकता? आता पत्रकार परिषद घेऊन गेल्या ५ वर्षांत काय केले याचा हिशेब देण्याची वेळ आली आहे. तुमचे रिपोर्ट कार्ड सादर करा. राजस्थानमध्ये घोटाळा, भ्रष्टाचार आणि जातीयवादाचे धोरण याशिवाय तुम्ही काहीही केले नाही. याबद्दल जनतेला उत्तर द्या, असे सडेतोड मत शाह यांनी मांडले.