|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:00 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.14° C

कमाल तापमान : 28.71° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 67 %

वायू वेग : 2.43 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.71° C

Weather Forecast for
Friday, 03 May

27.24°C - 30.1°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.45°C - 30.54°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

27.69°C - 30.8°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.08°C - 31.07°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.26°C - 30.62°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.88°C - 30.09°C

sky is clear

अयोध्येचा संकल्प पूर्ण, आता तयारी मथुरा-काशीची!

अयोध्येचा संकल्प पूर्ण, आता तयारी मथुरा-काशीची!– तारीखही आजच सांगितली, अयोध्या, (२१ जानेवारी) – श्रीराम जन्मभूमीवरील भव्य मंदीरात श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा उद्या होणार आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने आमंत्रित लोक अयोध्येत दाखल होत आहेत. राम मंदीर प्रकरणात वकील असलेले हरिशंकर जैनदेखील या सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे आता त्यांच्याकडे काशी विश्वनाथ प्रकरणाचे काम सुरू आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ‘अयोध्या तो बस झांकी है…काशी-मथुरा बाकी है’ या धाटणीचे उत्तर दिले. सध्या राष्ट्रीय स्तरावरील १६ मंदीरांच्या केसेस...22 Jan 2024 / No Comment /

प्राणप्रतिष्ठेपूर्वीच एक लाख कोटींचा व्यवसाय

प्राणप्रतिष्ठेपूर्वीच एक लाख कोटींचा व्यवसाय– व्यापारी संघटना ‘कॅटची माहिती, नवी दिल्ली, (२१ जानेवारी) – अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा केवळ एक दिवसावर आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी अनेक स्तरांतून सुरू असून, उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या वातावरणाचा व्यापारी जगतालाही मोठा फायदा होत आहे. प्राणप्रतिष्ठेपूर्वी आतापर्यंत देशभरातील व्यापार्‍यांनी एक लाख कोटी रुपयांचा व्यवसाय केला असल्याची माहिती व्यापारी संघटना कॅटने दिली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ही किरकोळ व्यापार्‍यांची संघटना आहे. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमामुळे व्यापारासाठी...22 Jan 2024 / No Comment /

राममय झाले मुकेश अंबानींचे घर!

राममय झाले मुकेश अंबानींचे घर!– ‘जय श्री राम’ आणि भगव्या रंगाने उजळले ‘अँटिलिया’, मुंबई, (२१ जानेवारी) – केवळ अयोध्याच नाही तर, संपूर्ण जग राममयीने सजले आहे. रामलल्लाच्या अभिषेकसाठी आता काही क्षणच उरले आहेत. संपूर्ण जग रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांचे घर ’अँटिलिया’ देखील भगव्या आणि ’जय श्री राम’च्या दिव्यांनी सजवण्यात आले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मुकेश अंबानी यांनाही प्राण प्रतिष्ठासाठी आमंत्रित करण्यात आले आहे....21 Jan 2024 / No Comment /

प्राणप्रतिष्ठेसाठी एकूण ८००० मान्यवरांना आमंत्रण

प्राणप्रतिष्ठेसाठी एकूण ८००० मान्यवरांना आमंत्रणअयोध्या, (२० जानेवारी) – राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम २२ जानेवारीला अयोध्येत होणार आहे. त्यासाठी देशभरात जल्लोषाचे वातावरण सुरू आहे. दरम्यान, राज्याच्या पाहुण्यांची यादी येऊ लागली आहे. या सोहळ्यासाठी सुमारे आठ हजार लोकांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपट उद्योगातील या यादीत अभिनेता प्रभास, रजनीकांत, अजय देवगण, अक्षय कुमार, अल्लू अर्जुन, मोहनलाल, अनुपम खेर आणि चिरंजीवी यांचा समावेश आहे. याशिवाय सरोद वादक अमजद अली, गीतकार मनोज मुंतशीर आणि त्यांची...21 Jan 2024 / No Comment /

राम मंदिराचा प्रसाद देण्याच्या नावाखाली वाढली सायबर फसवणूक

राम मंदिराचा प्रसाद देण्याच्या नावाखाली वाढली सायबर फसवणूक– केली जात आहे राम भक्तांची फसवणूक, – नॅशनल सायबर हेल्पलाइन (१९३०) वर कॉल करून माहिती द्या, अयोध्या, (२० जानेवारी) – संपूर्ण देश राम लल्लाच्या आगमनाच्या तयारीत व्यस्त असताना सायबर ठगांनी देवाच्या नावावर फसवणूक करण्याचा नवा प्रकार समोर आणला आहे. वास्तविक, रामनगरी अयोध्येत २२ जानेवारीला अभिषेक होणार आहे. सायबर ठग राम लल्लाच्या प्रसादाच्या नावावर लोकांची फसवणूक आहेत. जर तुम्हालाही असा कॉल किंवा मेसेज आला तर त्यांच्या फंदात न पडता नॅशनल...21 Jan 2024 / No Comment /

रामललाचे वकील म्हणून रविशंकर प्रसाद यांना निमंत्रण

रामललाचे वकील म्हणून रविशंकर प्रसाद यांना निमंत्रणनवी दिल्ली, (२१ जानेवारी) – अयोध्येतील रामजन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी देशभरातून जवळपास आठ हजारावर मान्यवरांना बोलवण्यात आले. यात समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता. या कार्यक्रमासाठी कोणाला आमंत्रित करायचे, याचे काही निकष ठरविण्यात आले होते. त्यानुसार निमंत्रणे पाठवण्यात आली. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण आले. मात्र, हे निमंत्रण ज्येष्ठ भाजपा नेते वा माजी केंद्रीय मंत्री म्हणून नव्हते, तर...21 Jan 2024 / No Comment /

पीएम मोदी आज ’राम सेतू’ ला देणार भेट

पीएम मोदी आज ’राम सेतू’ ला देणार भेटनवी दिल्ली, (२१ जानेवारी) – अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याच्या एक दिवस आधी, रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सैन्यासह ज्या ठिकाणी राम सेतू बांधला, त्या ठिकाणी भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी अरिचल मुनई पॉइंटला भेट देणार आहेत. पंतप्रधान सकाळी ९.३० च्या सुमारास तेथे पोहोचतील. यानंतर पंतप्रधान मोदी सकाळी १०.१५ वाजता श्री कोठंडाराम स्वामी मंदिरात पूजा करतील. कोठंडाराम नावाचा अर्थ धनुष्य असलेला राम. हे धनुषकोडी येथे आहे. असे म्हणतात की येथेच...21 Jan 2024 / No Comment /

रामलालाच्या कपाळावर उतरणार सूर्यदेव!

रामलालाच्या कपाळावर उतरणार सूर्यदेव!अयोध्या, (२२ जानेवारी) – आज भगवान श्रीराम अयोध्या नगरीत विराजमान होणार आहेत. स्थापत्य कलेचे अप्रतिम उदाहरण सादर करण्यासोबतच राम मंदिर हे अत्यंत प्रगत वैज्ञानिक तंत्रज्ञानाचेही प्रतीक आहे. दरवर्षी रामजन्मोत्सवाच्या निमित्ताने तीन मजली राममंदिराच्या तळमजल्यावर स्थापित रामललाच्या कपाळावर सूर्याची किरणे उतरून त्यांचा अभिषेक केला जाईल, हे विशेष. ४० महिन्यांपूर्वी राम मंदिराच्या भूमिपूजनासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूर्यवंशी श्री राम यांचा सूर्याभिषेक करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि ते शक्य करून दाखविणे...21 Jan 2024 / No Comment /

२,००० कोटींच्या ८ अमृत प्रकल्पांची पंतप्रधान मोदींनी केली पायाभरणी

२,००० कोटींच्या ८ अमृत प्रकल्पांची पंतप्रधान मोदींनी केली पायाभरणी– सोलापूर येथे १५,००० घरांचे पंतप्रधानांनी केले लोकार्पण, सोलापूर, (१९ जानेवारी) – महाराष्ट्रातील सोलापूर येथे सुमारे २,००० कोटी रुपयांच्या ८ अमृत (अटल कायाकल्प आणि शहरी परिवर्तन अभियान) प्रकल्पांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पायाभरणी केली. महाराष्ट्रात पीएमएवाय-शहरी अंतर्गत पूर्ण झालेली ९०,००० हून अधिक घरे आणि सोलापूरमधील रेनगर गृहनिर्माण सोसायटीची १५,००० घरे पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केली. याच्या लाभार्थ्यांमध्ये हजारो हातमाग कामगार, विक्रेते, यंत्रमाग कामगार, कचरा वेचणारे, बिडी कामगार, वाहनचालक आणि इतरांचा...19 Jan 2024 / No Comment /

पंतप्रधान मोदींनी केले बंगळुरूमध्ये बोईंग कॅम्पसचे उद्घाटन

पंतप्रधान मोदींनी केले बंगळुरूमध्ये बोईंग कॅम्पसचे उद्घाटनबंगळुरू, (१९ जानेवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बंगळुरूमध्ये बोईंगच्या नवीन जागतिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्र कॅम्पसचे उद्घाटन केले. यावेळी राज्यपाल थावरचंद्र गेहलोत, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. भारतातील तरुणांचे अभिनंदन : मोदी पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या वर्षी कर्नाटकात आशियातील सर्वात मोठी हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना पूर्ण झाला. आता हे जागतिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्रही सापडणार आहे. यावरून कर्नाटक एक प्रमुख हवाई वाहतूक केंद्र म्हणून कसे विकसित होत...19 Jan 2024 / No Comment /

मोदी करत आहेत कठोर अनुष्ठान

मोदी करत आहेत कठोर अनुष्ठान– नारळपाणी, सात्विक भोजन, जमिनीवर झोप, कठोर नियमांचे पालन, अयोध्या, (१९ जानेवारी) – अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ दिवस विशेष धार्मिक विधी करत आहेत. पंतप्रधान मोदी कठोर अनुष्ठान काळात कडक दिनचर्या पाळत आहेत. या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी जमिनीवर झोपतात आणि फक्त नारळ पाणी पितात. पीएम मोदींनी १२ जानेवारीलाच सांगितले होते की, ते राम मंदिराच्या अभिषेकासाठी विशेष विधी करत आहेत. राम मंदिराच्या उद्घाटनाची...19 Jan 2024 / No Comment /

दिल्लीत आठ दिवसांसाठी उड्डाणांवर बंदी

दिल्लीत आठ दिवसांसाठी उड्डाणांवर बंदीनवी दिल्ली, (१९ जानेवारी) – प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाच्या पार्श्वभूमीवर १९ जानेवारी ते २६ जानेवारी २०२४ या काळात दिल्लीच्या हवाई क्षेत्रात काही तासांसाठी निर्बंध असतील. दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने सांगितले की, १९ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत सकाळी १०:२० ते दुपारी १२:४५ दरम्यानच्या फ्लाइटवर निर्बंध असतील. या कालावधीत दिल्ली विमानतळावरून कोणतेही विमान येणार नाही किंवा निघणार नाही. प्रजासत्ताक दिनी ही बंदी घालण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या आठवड्यात, नोटम (एअरमनला नोटीस)...19 Jan 2024 / No Comment /