किमान तापमान : 29.03° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 5.02 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.43°से. - 30.53°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.65°से. - 29.75°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.11°से. - 30.16°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.62°से. - 31.24°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.06°से. - 30.11°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.3°से. - 30.22°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– तारीखही आजच सांगितली,
अयोध्या, (२१ जानेवारी) – श्रीराम जन्मभूमीवरील भव्य मंदीरात श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा उद्या होणार आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने आमंत्रित लोक अयोध्येत दाखल होत आहेत. राम मंदीर प्रकरणात वकील असलेले हरिशंकर जैनदेखील या सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे आता त्यांच्याकडे काशी विश्वनाथ प्रकरणाचे काम सुरू आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ‘अयोध्या तो बस झांकी है…काशी-मथुरा बाकी है’ या धाटणीचे उत्तर दिले.
सध्या राष्ट्रीय स्तरावरील १६ मंदीरांच्या केसेस न्यायालयासमोर सुनावणीसाठी टेबलवर आल्या असून, येत्या २०२९ पर्यंत त्यांचा निपटारा होईल, अशी शक्यता जैन यांनी व्यक्त केली आहे. ‘आक्रमकांनी तोडलेल्या मंदीरांप्रती हिंदूंच्या भावना गुंतलेल्या आहेत. त्यामुळे, आगामी काळात त्याविषयी निर्णय घेणे आवश्यक होणार आहे. जसजसे न्यायालयाचे निर्णय होत जातील तसतसे मंदीरांचे बांधकाम होत जाणार आहे. काशी आणि मथुरा या दोन्ही देवस्थानांविषयीचे वकीलपत्र मी घेतले आहे,’ अशा तीव्र शब्दांत जैन यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली.
यामध्ये, हिंदूंचे उत्थान होत असून ते कोणीही थांबवू शकणार नाही. सरकारची काहीही भूमिका नाही. कायद्याला धरून कागदपत्रे आणि न्याय्य पुराव्यांच्या मदतीनेच हे प्रकरण न्यायालयात उभे राहणार आहे. पण, २०२९ पूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशी आणि मथुरेतील मंदीरांचे भूमीपूजनही होईल आणि उद्घाटनही त्यांच्याच हस्ते होईल, असे वकील जैन यांनी आत्मविश्वासाने सांगितले.