किमान तापमान : 26.99° C
कमाल तापमान : 27.12° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 78 %
वायू वेग : 1.68 Mps
स्थळ : Mumbai, IN
26.99° C
26.99°C - 30.45°C
sky is clear27.3°C - 30.34°C
sky is clear27.48°C - 30.57°C
sky is clear28°C - 30.56°C
few clouds28°C - 30.08°C
sky is clear27.36°C - 29.66°C
few cloudsजेरुसलेम, (३० नोव्हेंबर) – इस्लामिक दहशतवादी संघटना हमासने गाझापट्टीतून गुरुवारी पहाटे इस्रायली ओलिसांची मुक्तता केल्यानंतर इस्रायलने आज आणखी १६ पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली. इस्रायल आणि हमासमधील संघर्षविरामाच्या सहाव्या दिवशी ही अदलाबदल झाली आहे.
इस्रायलचे हवाई आणि जमिनीवरील हल्ले रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय मध्यस्थ संघर्षविरामाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात असताना इस्रायल आणि हमासमध्ये ही अदलाबदली झाली. सकाळ होण्यापूर्वी पॅलेस्टिनी कैदी असलेली बस रामल्लाहच्या वेस्ट बँकमध्ये दाखल झाल्याचे दिसून आले. मुक्त केलेल्यांमध्ये सर्वांत महत्त्वाची अहेद तमिमी ही २२ वर्षीय तरुणी होती. तिने २०१७ मध्ये इस्रायली सैनिकाला थापड मारल्याची चित्रफीत समाज माध्यमावर व्हायरल झाल्यावर जगभरात प्रसिद्धी मिळवली होती. इन्स्टाग्रामवर दहशतवादाला चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली इस्रायलच्या लष्कराने तिला ६ नोव्हेंबर रोजी वेस्ट बँक येथील तिच्या घरातन अटक केली होती. तमिमीचे इन्स्टाग्राम खाते हॅक करण्यात आले होते, असा दावा तिच्या आईने केला. संघर्षविरामाच्या प्रत्येक दिवशी पॅलेस्टिनी कैद्यांच्या मोबदल्यात इस्रायलच्या ओलिसांची सुटका केली जात आहे. आतापर्यंत इस्रायलच्या ९७ ओलिसांची मुक्तता करण्यात आली आहे. इस्रायलने आतापर्यंत २१० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली आहे.