किमान तापमान : 27.82° C
कमाल तापमान : 28.6° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 80 %
वायू वेग : 1.79 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.6° C
28.32°C - 30.38°C
sky is clear27.59°C - 30.24°C
sky is clear27.5°C - 29.74°C
sky is clear27.47°C - 30.36°C
sky is clear27.7°C - 29.77°C
sky is clear28.12°C - 30.09°C
overcast cloudsबीजिंग, (३१ ऑक्टोबर) – चीनने आपल्या नकाशातून इस्रायलचे नाव गायब केले. चिनी कंपन्या बायडू आणि अलिबाबाच्या ऑनलाईन नकाशातून इस्रायले नाव गायब करण्यात आले. बायडूच्या नकाशात इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या सीमा दाखवण्यात आल्या. मात्र, यातून दोघांचेही नावे गायब आहेत.
मँडेरियन भाषेतील नकाशांमध्ये लक्झमबर्गसारख्या लहान देशाचे नाव आहे, पण इस्रायलसारख्या महत्त्वपूर्ण देशाचे नाव नसल्याने प्रश्न उपस्थित झाले आहे. अलिबाबा किंवा बायडू दोन्ही कंपन्यांनी आतापर्यंत यावर कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. महत्त्वाचे म्हणजे, इस्रायल आणि हमासच्या युद्धात चीन सरकारने जे वक्तव्य जारी केले, त्यात हमासच्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला नव्हता; मात्र पॅलेस्टाईनचे समर्थन करण्यात आले होते. त्यासाठी चीनवर टीका झाली होती. त्यानंतर चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांनी इस्रायली समकक्ष एली कोहेने यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर कबूल केले की, इस्रायलला स्वतःच्या सुरक्षेचा पूर्ण अधिकार आहे. सोबतच चीनने युद्धबंदी करण्याची मागणीही केली होती.
दोन्ही कंपन्यांनी उचललेल्या या पावलामुळे चिनी नागरिकही हैराण झाले आहेत. चीनच्या नकाशातून इस्रायलचे नाव पहिलेच गायब झाले होते अथवा युद्ध सुरू झाल्यानंतर गायब करण्यात आले, हे स्पष्ट झाले नाही. चीन स्वतःच्या नकाशाबाबत नेहमी गोंधळ घालत असतो. विविध हॉटेल्सच्या संकेतस्थळावर चिनी दक्षिण सागर वादग्रस्त दाखवल्या गेल्यास चीन त्यावर आक्षेप घेत असतो.