किमान तापमान : 28.56° C
कमाल तापमान : 28.85° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 81 %
वायू वेग : 5.35 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.85° C
28.72°C - 30.59°C
sky is clear28.09°C - 30.43°C
sky is clear27.96°C - 30.27°C
sky is clear27.6°C - 29.85°C
sky is clear27.94°C - 30.15°C
few clouds27.93°C - 29.93°C
few clouds– अमेरिकी गुप्तचर अहवालात दावा,
वॉशिंग्टन, (०३ नोव्हेंबर) – रशियातील वॅगनर ग्रूप लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाला हवाई संरक्षण यंत्रणा उपलब्ध करून देणार असल्याचा दावा अमेरिकी गुप्तचर अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे इस्रायल आणि हमासमध्ये पेटलेल्या युद्धाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. इस्रायलच्या विरोधात लढण्यासाठी हमास आणि हिजबुल्लाने हातमिळवणी केली असून, ते संयुक्तपणे हल्ले करणार असल्याचे सांगितले जाते.
वॅगनर ग्रूप आणि हिजबुल्ला यांच्यात सुरू असलेल्या चर्चेवर अमेरिकी अधिकारी नजर ठेवून असल्याचे वृत्त अमेरिकेतील माध्यमांनी दिले. वॅगनर ग्रूप हिजबुल्लाला एसए-२२ क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा देण्याची शक्यता आहे. ही संरक्षण यंत्रणा लढाऊ विमानविरोधी क्षेपणास्त्रे आणि बंदुकीच्या मदतीने हवाई हल्ले रोखण्यास सक्षम आहे. एसएए-२२ यंत्रणेला पेंटासिर-एस१ नावानेही ओळखले जाते. ही यंत्रणा एका ट्रकवर तैनात केली जाऊ शकते आणि या माध्यमातून लढाऊ विमानाला लक्ष्य करणे शक्य आहे. वॅगनर ग्रूपकडून ही यंत्रणा मिळाल्यानंतर हिजबुल्लाची हवाई हल्ल्याच्या विरोधातील ताकद वाढणार आहे.
वॅगनर आणि हिजबुल्लाचे नेते सध्या सीरियात आहेत आणि लवकरच या सौद्यावर सहमती होऊ शकते. या हवाई संरक्षण यंत्रणेचा वापर हिजबुल्लाचे अतिरेकी करतील अथवा ती हमासला मदत करण्यासाठी गाझापट्टीत पाठवली जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रशियाच्या अधिकार्यांनी या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. रशियाने पॅलेस्टाईनचे समर्थन केले आहे तसेच सुरक्षा परिषदेत पाश्चिमात्य देशांचा यावरील प्रस्ताव फेटाळला आहे.
पश्चिम आशियात वाढले अमेरिकी सैन्य
पश्चिम आशियात अमेरिका सैन्य वाढवत आहे. अमेरिकेने येथे हवाई संरक्षण यंत्रणाही तैनात केली आहे. हिजबुल्लाने हमासच्या मदतीला जाऊ नये, म्हणून अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे. असे असतानाही मागील आठवड्यात हिजबुल्ला, हमास आणि पॅलेस्टाईन मुस्लिम जिहादी संघटनेच्या नेत्यांची बैठक झाली असल्याची माहिती आहे.