|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:57 | सूर्यास्त : 18:48
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.41° C

कमाल तापमान : 31.13° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 69 %

वायू वेग : 7.59 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.13° C

Weather Forecast for
Friday, 10 May

27.69°C - 31.99°C

few clouds
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.57°C - 29.9°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

27.86°C - 30.16°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 13 May

28.03°C - 30.38°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 14 May

27.81°C - 30.77°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 15 May

28.49°C - 30.72°C

sky is clear

शेतकर्‍यांचे ’रेल रोको आंदोलन’ तिसर्‍या दिवशीही सुरू

शेतकर्‍यांचे ’रेल रोको आंदोलन’ तिसर्‍या दिवशीही सुरू-अनेक गाड्या रद्द, प्रवासी नाराज, चंदीगड, (३० सप्टेंबर) – नुकत्याच आलेल्या पुरात उद्ध्वस्त झालेल्या पिकांची भरपाई, एमएसपीवर कायदेशीर हमी आणि सरसकट कर्जमाफी या मागण्यांसाठी पंजाबमधील शेतकर्‍यांचे ’रेल रोको’ आंदोलन शनिवारी तिसर्‍या दिवशी दाखल झाले. रेल्वे अधिकार्‍यांनी सांगितले की, आंदोलनामुळे ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे, अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, काहींचे वेळापत्रक बदलले आहे किंवा वळवण्यात आले आहे. तीन दिवसीय आंदोलनाचा एक भाग म्हणून गुरुवारपासून फरीदकोट, समराळा, मोगा, होशियारपूर, गुरुदासपूर,...30 Sep 2023 / No Comment /

लोकसभा निवडणुकीनंतर मान सरकार पडणार?

लोकसभा निवडणुकीनंतर मान सरकार पडणार?चंदीगड, (२६ सप्टेंबर) – पुढील लोकसभा निवडणुकीनंतर भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडेल, असा दावा पंजाबमधील काँग्रेस खासदार आणि ज्येष्ठ नेते प्रताप सिंह बाजवा यांनी केला आहे. सध्याच्या सरकारमधील किमान ३२ लोक त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी पंजाबमधील जनतेला संसदीय निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे, कारण लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील विद्यमान सरकार दोन महिनेही टिकू शकणार नाही. प्रताजसिंग बाजवा म्हणाले की, पंजाब पूर्णपणे कर्जात...26 Sep 2023 / No Comment /

अमृतसर येथून पाकिस्तानी ड्रोन जप्त

अमृतसर येथून पाकिस्तानी ड्रोन जप्तअमृतसर, (२६ सप्टेंबर) – सीमा सुरक्षा दल आणि जिल्हा पोलिसांनी सोमवारी शोध मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील महावा गावातील शेतातून एक पाकिस्तानी ड्रोन जप्त केला आहे. आज (मंगळवार) अमृतसरच्या धौने खुर्द गावातील भातशेतीतून आणखी एक पाकिस्तानी ड्रोन जप्त करण्यात आला आहे. बीएसएफने ड्रोनच्या जप्तीची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स द्वारे शेअर केली आहे. बीएसएफ पंजाब फ्रंटियरच्या म्हणण्यानुसार, ड्रोनची हवेत हालचाल सुरक्षा दलाच्या लक्षात आली, त्यानंतर ड्रोनवर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर हे ड्रोन गायब...26 Sep 2023 / No Comment /

हत्या कॅनडात, छापे पंजाबात

हत्या कॅनडात, छापे पंजाबात-गुंड गोल्डी बराडच्या ठिकाणांवर छापे, चंदीगढ, (२१ सप्टेंबर) – गँगस्टर गोल्डी बराडच्या जवळपास एक हजार गुंडांना पकडण्यासाठी पंजाब पोलिसांनी छापेमारी सुरू करीत आहे. यासाठी पाच हजारांपेक्षा जास्त पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले. या दरम्यान कॅनडातील पिनिपेग सिटीत फरार गँगस्टर सुखदूलसिंग ऊर्फ सुक्खा दुनुकेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. याची जबाबदारी बिश्नोई टोळीने स्वीकारली. खलिस्तान समर्थक सुक्खाची हत्या लक्षात घेता पंजाबमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला. प्रत्येक संशयितावर करडी नजर...21 Sep 2023 / No Comment /

पन्नूची मुख्यमंत्री भगवंत मान यांना धमकी

पन्नूची मुख्यमंत्री भगवंत मान यांना धमकीचंदिगढ, (०१ सप्टेंबर) – सध्या गुगलवर पंजाबमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी मानवी बॉम्ब आणि मारेकरी तयार करण्यासाठी एक अ‍ॅप बनवले जात आहे. परदेशी भूमीवर विकसित होणार्‍या या अ‍ॅपचे नावही ठेवण्यात आले आहे. पंजाबचे वातावरण बिघडवण्याचा हा कट खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू आणि त्याची संघटना शिख फॉर जस्टिसने रचला आहे. एवढेच नाही तर पन्नूने ३१ ऑगस्टला पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांच्या पुण्यतिथीला ही घोषणा केली. दरम्यान, पन्नू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री...1 Sep 2023 / No Comment /

नूह हिंसाचारामागे काँग्रेसचा हात?

नूह हिंसाचारामागे काँग्रेसचा हात?चंदीगड, (२९ ऑगस्ट) – ३१जुलै रोजी मुस्लिम जमावाने नूह येथे हिंदूविरोधी हिंसाचार केल्याप्रकरणी फिरोजपूरचे काँग्रेस आमदार झिरका मम्मन खान यांच्याविरुद्ध पुरावे सापडले असल्याचे हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी राज्य विधानसभेत सांगितले. विज म्हणाले की, आतापर्यंतच्या तपासाच्या आधारे पुरावे काँग्रेसच्या भूमिकेकडे निर्देश करतात. काँग्रेस आमदार मम्मन खान यांना सीआरपीसीच्या कलम १६० अंतर्गत नोटीस बजावल्याच्या एका दिवसानंतर गृहमंत्र्यांचे विधान आले आहे, त्यांना तपासात सामील होण्यास आणि नगीना पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले...29 Aug 2023 / No Comment /

नूह हिंसाचारावर मोठी कारवाई; ५० गावांमध्ये छापे

नूह हिंसाचारावर मोठी कारवाई; ५० गावांमध्ये छापेनूह, (१४ ऑगस्ट) – नूह हिंसाचारानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध तीव्र केला आहे. नूह व्यतिरिक्त, आठ पोलिस पथके राजस्थानमधील अलवर आणि भरतपूर येथे छापे टाकत आहेत. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, पोलिसांनी या संदर्भात सुमारे ५० गावे ओळखली आहेत. तेथून ५,००० हून अधिक तरुण आणि इतर हिंसाचारात सामील झाले आहेत. असे पोलीस या आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओळखली गेलेली बहुतांश गावे नूह जिल्ह्यातील आहेत. अशा स्थितीत...14 Aug 2023 / No Comment /

जे. पी. नड्डा यांनी घेतली अमरिंदर सिंग यांची भेट

जे. पी. नड्डा यांनी घेतली अमरिंदर सिंग यांची भेटचंदीगड, (१५ जून) – भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांची मोहाली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सौदान सिंग हेही होते. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असलेले अमरिंदर सिंग म्हणाले की, जे. पी. नड्डा, सौदान सिंग यांचे माझ्या निवासस्थानी स्वागत करताना आनंद झाला. यावेळी अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आणि खासदार प्ररणीत कौर, मुलगी जय इंदर कौर आणि...15 Jun 2023 / No Comment /

सुवर्ण मंदिरात खलिस्तानी घोषणा; भिंद्रनवालेचे पोस्टर

सुवर्ण मंदिरात खलिस्तानी घोषणा; भिंद्रनवालेचे पोस्टरअमृतसर, (६ जून) – ऑपरेशन ब्लू स्टारच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त सुवर्ण मंदिरात खलिस्तानी घोषणा दिल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. श्री हरमंदिर साहिब येथील श्री अकाल तख्त येथे खलिस्तानच्या घोषणा देण्यात आल्या आणि खलिस्तानी दहशतवादी जर्नेल सिंग भिंद्रनवाले यांचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. शीख समुदायाला दिलेल्या संदेशात श्री अकाल तख्तचे जथेदार ग्यानी हरप्रीत सिंग यांनी शीख समुदायाला श्री अकाल तख्तच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्याचे आवाहन केले. सुवर्णमंदिरात अशी घटना घडू नये म्हणून...6 Jun 2023 / No Comment /

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना झेड प्लस

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना झेड प्लसनवी दिल्ली, (२५ मे) – केंद्रीय गृह मंत्रालयाने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना झेड+ सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. खलिस्तानी नेता अमृतपाल सिंग याच्या अटकेनंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीएम मान यांना आता देशभरात झेड+ सुरक्षा मिळणार आहे. त्यांना ही सुरक्षा सीआरपीएफ पुरवणार आहे. त्याला देशभरातील सीआरपीएफ कडून झेड+ सुरक्षा कवच दिले जाईल. केंद्र सरकारने झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे...25 May 2023 / No Comment /

सुवर्ण मंदिराजवळील स्फोट, अमृतपालच्या सुटकेसाठी?

सुवर्ण मंदिराजवळील स्फोट, अमृतपालच्या सुटकेसाठी?-बॉबस्फोटाच्या ठिकाणाहून पोलिसांना सापडले पत्र, चंदिगढ, (१२ मे) – पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळ गुरुवारी स्फोट झाला. पाच दिवसांत स्फोटाची ही तिसरी घटना आहे. या स्फोटांमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, आता स्फोटाच्या ठिकाणी एक पत्र सापडले आहे.यामध्ये खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग यांना सोडण्याचे सांगण्यात आले आहे. पत्र मिळाल्यानंतर पोलीस अधिक सतर्क झाले असून या प्रकरणाचा तपास करत आहेत. बॉम्बस्फोट प्रकरणात पंजाब पोलिसांनी नवीन स्थानिक दहशतवादी नेटवर्कशी संबंधित ५ जणांना...12 May 2023 / No Comment /

अमृतपालला मदत करणार्‍या वकिलासह तिघांना अटक!

अमृतपालला मदत करणार्‍या वकिलासह तिघांना अटक!नवी दिल्ली, (१५ एप्रिल) – फरार असलेला ’वारीस पंजाब दे’ प्रमुख अमृतपाल सिंग याला मदत केल्याप्रकरणी वकिलासह तीन जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी दोन जण जालंधर जिल्ह्यातील आणि एक होशियापूरच्या बाबक गावातील असल्याची माहिती आहे. वारिस पंजाब देचा प्रमुख अमृतपाल सिंग १८ मार्चपासून फरार असून आपले लपण्याचे ठिकाण बदलत आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी अद्याप कोणत्याही उच्चपदस्थ अधिकार्‍याने कोणतेही वक्तव्य दिलेले नाही, मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे अन्वेषण संस्थेने...15 Apr 2023 / No Comment /