किमान तापमान : 26.49° से.
कमाल तापमान : 26.82° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 39 %
वायू वेग : 3.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.82° से.
24.66°से. - 28.14°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.05°से. - 28.38°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.28°से. - 28.24°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.41°से. - 27.68°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.18°से. - 27.95°से.
रविवार, 01 डिसेंबर कुछ बादल23.02°से. - 26.24°से.
सोमवार, 02 डिसेंबर टूटे हुए बादल-बॉबस्फोटाच्या ठिकाणाहून पोलिसांना सापडले पत्र,
चंदिगढ, (१२ मे) – पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळ गुरुवारी स्फोट झाला. पाच दिवसांत स्फोटाची ही तिसरी घटना आहे. या स्फोटांमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, आता स्फोटाच्या ठिकाणी एक पत्र सापडले आहे.यामध्ये खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग यांना सोडण्याचे सांगण्यात आले आहे. पत्र मिळाल्यानंतर पोलीस अधिक सतर्क झाले असून या प्रकरणाचा तपास करत आहेत. बॉम्बस्फोट प्रकरणात पंजाब पोलिसांनी नवीन स्थानिक दहशतवादी नेटवर्कशी संबंधित ५ जणांना अटक केली आहे. बॉम्ब बनवणारे नवशिके असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सुवर्ण मंदिराभोवती स्फोट करून पंजाबमध्ये अशांततेचे वातावरण निर्माण करणे हा त्यांचा उद्देश होता.
शनिवारी सुवर्ण मंदिराच्या पार्किंगमध्ये बनवलेल्या रेस्टॉरंटमध्ये स्फोट झाला होता. तेव्हा पोलिसांनी तो चिमणी स्फोट असल्याचे सांगितले होते. यानंतर ना संपूर्ण परिसर सील करण्यात आला, ना परिसर झाकून मार्किंग करण्यात आले. एवढेच नव्हे तर फॉरेन्सिक तपासणीसाठीही परिसर सील करण्यात आलेला नाही. स्फोटाच्या ठिकाणी पोलिसांसह सर्वसामान्य नागरिकांच्या हालचालीमुळे फॉरेन्सिक टीमला स्फोटात वापरलेल्या रसायनाचे नमुने घेण्यात अडचण आली. यानंतर सोमवारी झालेल्या स्फोटात हे स्फोटक धातूच्या डब्यात ठेवण्यात आले होते.पोलिसांनी घटनास्थळावरून अनेक धातूचे तुकडे जप्त केले आहेत. पोटॅशियम नायट्रेट आणि सल्फरचा वापर करून इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडी) द्वारे हा स्फोट घडवून आणण्यात आल्याचा संशय आहे. तिसरा स्फोट कॉरिडॉरच्या बाजूला असलेल्या श्री गुरु रामदास सराईजवळ रात्री १ वाजता सुवर्ण मंदिराजवळ झाला.