किमान तापमान : 21.99° से.
कमाल तापमान : 23.77° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 49 %
वायू वेग : 4.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
21.99° से.
21.99°से. - 28.49°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.46°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.66°से. - 28.57°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.19°से. - 28.07°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर छितरे हुए बादल22.54°से. - 28.07°से.
रविवार, 01 डिसेंबर कुछ बादल22.51°से. - 26.58°से.
सोमवार, 02 डिसेंबर टूटे हुए बादल– भाजप नेते डॉ. अनिल बोंडेंनी पाठविले पत्र,
नवी दिल्ली, (१२ मे) – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानाच्या नूतनीकरणावर ४५ कोटी रुपये खर्च केल्याने त्यांच्यावर चुहुबाजूने टीकेची झोड उठत आहे. भाजपच्या आरोपानुसार केजरीवाल यांनी त्यांच्या निवासस्थानी कोट्यवधींचे कार्पेट्स, पडदे, मार्बल लावले आहेत. या मुद्दावरून महाराष्ट्रातील भाजपचे नेते खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आक्रमक होत केजरीवालांना थेट आव्हान दिले आहे.
अण्णा हजारेंना प्रतिज्ञापत्र देऊन आयुष्यभर मंदिरात राहण्याचे वचन देणार्या व्यक्तीचे आलिशान घर पाहण्यास मी माझ्या झोपडपट्टीत राहणार्या भावा-बहिणींसोबत उत्सुक असल्याची उपरोधिक टीका त्यांनी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना केजरीवाल यांनी दिलेल्या तत्कालीन प्रतिज्ञा पत्राच्या दाखला देत डॉ.बोंडे यांनी केजरीवाल यांना घर सर्वसामान्यांना खुले करावे, जेणेकरून केजरीवालांचा खोटारडेपणा जनतेसमोर येईल.
डॉ. बोंडे सध्या दिल्ली दौर्यावर आहेत. दरम्यान त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज, १२ मे रोजी एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी केजरीवाल यांच्या आलिशान जीवनाचा चांगलाच समाचार घेतल्याचे दिसत आहे. या पत्रात ते म्हणाले की, मी असे ऐकले की आपण अतिशय सुंदर घर तयार केले आहे. माझ्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना आपण प्रतिज्ञापत्र दिले होते. त्यामध्ये साधेपणाने आयुष्य जगेल. शासकीय वाहनाचा उपयोग करणार नाही. याउलट आपण शाही जीवनशैलीचा अंगीकार करत सुंदर राजमहल थाटला आहे. आपले नैसर्गिक व कलाप्रेम पाहुन कलाकारांद्वारे तयार करण्यात आलेले शिल्प, इटालियन मार्बल सुद्धा घरात लावण्यात आले आहे. आपले बाथरूम व शौचालयाचे फार सुंदर बांधकाम करण्यात आल्याचे ऐकिवात आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे की, असा सुंदर राजमहल पाहण्याची संधी माझ्यासह झोपडपट्टीत राहणार्या माझ्या गरीब बांधवांना सुद्धा मिळावी. जेणेकरून महाराष्ट्रात सुद्धा असे घर बांधता येईल.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आजही मंदिरात राहून भगवान श्री हनुमानजींची आराधना करतात व त्यांचे शिष्य आलिशान घरात राहत आहे. असा उल्लेख करत डॉ. बोंडे यांनी पत्रात केजरीवाल यांच्यावर जोरदार उपरोधिक टीकास्त्र सोडले आहे. ज्या व्यक्तीने आपल्या गुरूंच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणात प्रवेश केला व आयुष्यभर मंदिरात राहण्याची प्रतिज्ञा केली होती. त्या व्यक्तींने हा आलीशान महाल बांधला आहे. त्यामुळे अशा व्यक्तीचे घर निष्पक्षपणे कसे चालत असेल हा सुद्धा एक कळीचा प्रश्न असल्याचे डॉ. बोंडे म्हणाले. पुढे पत्रात केजरीवाल यांना चिमटे काढत ते म्हणाले की, मी सध्या दिल्लीत आहे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की, मला व माझ्या झोपडपट्टीत राहणार्या भावा-बहिणींना आपला आलीशान महल पाहण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. आपले घर पाहून मला सुद्धा प्रसन्नता प्राप्त होईल. केजरीवाल यांच्या घराच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद आता टोकाला गेल्याचे पाहायला मिळत आहे.