किमान तापमान : 26.83° से.
कमाल तापमान : 26.94° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 38 %
वायू वेग : 3.29 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.94° से.
23.91°से. - 28.49°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.46°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.66°से. - 28.57°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.19°से. - 28.07°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर छितरे हुए बादल22.54°से. - 28.07°से.
रविवार, 01 डिसेंबर कुछ बादल22.51°से. - 26.58°से.
सोमवार, 02 डिसेंबर टूटे हुए बादल-लोकसभा निवडणुकीची पृष्ठभूमी तयार,
अयोध्या, (१३ मे) – अयोध्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचे उमेदवार गिरीश त्रिपाठी यांनी समाजवादी पार्टीचे उमेदवार आशिष पांडे यांच्यावर ३५ हजार ६२५ मतांनी विजय मिळविला आहे. यात त्रिपाठी यांना ७७ हजार ४९४ (४८.६७ टक्के ) मते मिळाली. हा विजय म्हणजे भाजपासाठी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर महत्त्वपूर्ण चाचणी (लिटमस टेस्ट) असल्याचे सांगण्यात येते.
रामनगरी अयोध्या नव्वदच्या दशकापासून उत्तरप्रदेशात महत्त्वाचे राजकीय केंद्र राहिले आहे. राष्ट्रीय, राज्य वा स्थानिक पातळीवरील निवडणूक असो, याठिकाणी सर्वांचीच नजर स्थिरावलेली असते. २०१७ मध्ये अयोध्या महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर पहिल्या निवडणुकीत भाजपाने ऋषिकेश उपाध्याय यांच्या रूपात विजय मिळविला होता. यंदा गिरीश त्रिपाठी यांनी थेट ४८.६७ टक्के मते मिळवत मोठा विजय मिळविला. भाजपाने या विजयासाठी पूर्ण शक्ती पणाला लावली होती, हे विशेष. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी अन्य जागांशिवाय अयोध्यावर खास नजर ठेवली होती.
भाजपासाठी श्रीराम मंदिराची निर्मिती हा मोठा मुद्दा ठरला आहे. पुढील मकर संक‘ांतीनंतर राममंदिराचे गर्भगृह भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. दुसर्यांदा मुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी सर्वाधिक लक्ष अयोध्येवर ठेवले. प्रत्येक संधीवर त्यांनी अयोध्या खास बनविण्याचे काम केले. मागील दिवाळीनिमित्त त्यांनी येथे भेट दिली होती. याशिवाय आतापर्यंत कोट्यवधी रुपये विविध विकासयोजनांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार त्यांनी अयोध्येतूनच सुरू केला होता. हनुमानगडी येथे दर्शन आणि पूजा केली. रामललाचेही दर्शन घेतले.