Posted by वृत्तभारती
Sunday, January 10th, 2021
चंदीगड, १० जानेवारी – हरयाणाच्या करनाल जिल्ह्यात मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आयोजित केलेल्या किसान महापंचायत स्थळी आंदोलनकर्त्या शेतकर्यंानी आज रविवारी हल्ला चढवून, प्रचंड तोडफोड केली. खट्टर सभास्थळी येत असताना, त्यांना काळे झेंडे दाखवून, त्यांचा मार्ग अडविण्याचा प्रयत्न केला. आंदोलक हिंसाचारावर उतरले असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधुराचा मारा केला. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांचे महत्त्व शेतकर्यांना समजावून सांगण्यासाठी मुख्यमंत्री खट्टर यांनी या किसान महापंचायतीचे आयोजन केले होते. सभास्थळी राज्याच्या कानाकोपर्यातून...
10 Jan 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 28th, 2020
इंदिरा गांधींप्रमाणेच मोदींच्या हत्येची धमकी; देशद्रोही भाषणांची चित्रफीत आली समोर, चंदीगड, २८ नोव्हेंबर – पंजाबमधील शेतकर्यांनी केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात पुकारलेल्या ‘दिल्ली चलो’ आंदोलनात काही खलिस्तानवाद्यांचाही समावेश असून, या आंदोलनाच्या माध्यमातून मोठा हिंसाचार करण्याचा त्यांचा कट असल्याची धक्कादायक माहिती आहे. याबाबतची चित्रफीत आज समोर आली आहे. या आंदोलनातील काही शेतकरी अतिशय विखारी आणि देशद्रोही घोषणा देत आहेत. ‘जब इंदिरा गांधी को ये कर सकते है, तो मोदी को क्यू नही कर...
28 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 1st, 2020
चंदीगढ, १ नोव्हेंबर – मुलींना फसवाल तर ‘राम नाम सत्य’ होईल, असे सांगून लव्ह जिहादच्या विरोधात कठोर कायदा करणार असल्याची घोषणा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी केल्यानंतर हरयाणा सरकार लव्ह जिहादच्या विरोधात कायदा तयार करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल विज यांनी आज रविवारी दिली. लव्ह जिहादच्या विरोधात कायदा तयार करण्याचा विचार हरयाणा सरकार करीत आहे, असे ट्विट त्यांनी केले. लव्ह जिहादच्या विरोधात कठोर कायदा तयार करणार असल्याचे योगी आदित्यनाथ...
1 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, March 29th, 2016
चंदीगढ, [२८ मार्च] – अनेक दिवसांपासून प्रस्तावित जाट आरक्षण विधेयकाला हरयाणा मंत्रिमंडळाने अखेरीस मंजुरी दिली आहे. हे विधेयक आजच विधानसभेत मांडले जाईल तसेच ३१ मार्चपर्यंत जर जाट समाजाला आरक्षण मिळाले नाही तर फेब्रुवारीत झालेल्या आंदोलनापेक्षाही आणखी मोठे जाट आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अखिल भारतीय जाट आरक्षण समितीने दिला आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आता हे विधेयक राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. फेब्रुवारीमध्ये जाटांनी हरयाणामध्ये ओबीसी कोटा अंतर्गत आरक्षणासाठी तीव्र आंदोलन...
29 Mar 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, March 22nd, 2016
=जमानतदाराने हमी मागे घेतली= नवी दिल्ली, [२१ मार्च] – हरयाणातील शिक्षक भरती घोटाळ्यात १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेले आणि सध्या जामिनावर बाहेर आलेले माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांच्या जमानतदाराने हमीपत्र परत घेतल्याने चौटाला यांना आज सोमवारी पुन्हा एकदा अटक करण्यात आली. चौटाला यांना जामीन मिळावा, यासाठी सुरजित सिंग नावाच्या वक्तीने हमीपत्र सादर केले होते. आज त्यांनी विशेष सीबीआय न्यायालयात जाऊन हमीपत्र मागे घेण्याची परवानगी मागितली. न्या. संजय गर्ग यांनी...
22 Mar 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, March 17th, 2016
सिरसा, [१६ मार्च] – हरियाणातील सिरसामध्ये आधारकार्ड नोंदणी पथकाने एका १२ दिवसाच्या चिमुकल्याचे फोटोसहीत आधारकार्ड तयार केले आहे. विशेष म्हणजे अद्याप या मुलाचे बारसेही झाले नसल्याने त्याच्या नावाच्या ठिकाणी त्याच्या आईचा नामोल्लेख करत बेबी फर्स्ट ऑफ मीनाक्षी देवी असे नमूद केले आहे. सुधीर कुमार यांच्या पत्नी मीनाक्षी देवी यांनी २६ फेब्रुवारीला एका खासगी रुग्णालयात या बालकाला जन्म दिला. त्यानंतर रुग्णालयातर्फेच आधार नोंदणीसाठी बालकाची सर्व माहिती घेतली. तीन तासातच नोंदणी पथक...
17 Mar 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 19th, 2016
=मर्कट टोपी घालून आले होते बंदुकधारी= लुधियाना, [१८ जानेवारी] – राष्ट्रीय स्वयंसेयक संघाच्या येथील शाखा मैदानावर आज सोमवारी सकाळी साडेसहा वाजता अज्ञात समाजकंटकांनी बंदुकीतून दोन फैरी झाडल्या. तथापि, यात कुणीही जखमी झाले नाही. दरम्यान, स्थानिक शाखाप्रमुख हल्लेखोरांचे लक्ष्य होते, असा प्राथमिक निष्कर्ष सीसीटीव्ही फुटेजवरून काढण्यात आला आहे. सकाळी ६ वाजून ३१ मिनिटांनी मोटारसायकलवरून दोन तरुण आले आणि त्यांनी शाखा मैदानाच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी संघाची शाखा सुरू झालेली नव्हती. तसेच...
19 Jan 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, January 2nd, 2016
=४ दहशतवादी ठार, २ जवान शहीद= पठाणकोट, [२ जानेवारी] – जम्मू – पठाणकोट महामार्गावरील भारतीय लष्कराच्या हवाई तळावर काल रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात चार दहशतवादी ठार झाले असून दोन जवान शहीद झाले आहेत. याठिकाणी अजून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दहशतवाद्यांनी काल रात्री पंजाबमधील गुरूदासपूरचे अधीक्षक सलविंदर सिंग यांचे त्यांच्या गाडीसह अपहरण केले होते. त्यानंतर मध्यरात्री ३ च्या सुमारास लष्कराच्या वेशात...
2 Jan 2016 / No Comment / Read More »