Posted by वृत्तभारती
Sunday, July 18th, 2021
दहा आमदारांचा पक्षश्रेष्ठींना इशारा, चंदीगड, १८ जुलै – मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा अपमान करू नका. त्यांच्यामुळेच पंजाबमध्ये कॉंगे्रसची सत्ता आहे, याचा विसर होऊ देऊ नका, असा अप्रत्यक्ष इशारा पंजाब कॉंगे्रसमधील दहा आमदारांनी आज रविवारी पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिला आहे. १९८४ पासून अमरिंदरसिंग हेच शिखांचे नेते आहे. त्यांच्या लोकप्रियतेमुळे राज्यात कॉंगे्रसचे अस्तित्व आहे. त्यांचा अपमान हा संपूर्ण शिखांचा अपमान आहे, असे संयुक्त निवेदन या आमदारांनी एका पत्रपरिषदेतून जारी...
18 Jul 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, July 14th, 2021
सिद्धूंच्या वक्तव्याने पंजाबमध्ये खळबळ, चंदीगढ, १३ जुलै – पंजाबमधील राजकारणात आपली डाळ शिजत नसल्याचे लक्षात आल्यानंतर कॉंगे्रसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी आता नवा राग आळवला आहे. माझे काम आणि माझी भूमिका केवळ आम आदमी पार्टीनेच ओळखली आहे, असे त्यांनी सांगितले. यामुळे सिद्धू आपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मात्र पंजाबच्या राजकारणात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. आम आदमी पार्टी विरोधक असूनही, माझे कार्य पंजाबच्या हिताचे आहे...
14 Jul 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, July 1st, 2021
एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न, चंदीगड, १ जुलै – एकीकडे दिल्लीत प्रियांका वढेरा व राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर पंजाबमधील पेचप्रसंगावर हायकमांडच्या तोडग्याची वाट पाहणार्या असंतुष्ट नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पुन्हा एकदा कुरघोडी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी चंदीगडमध्ये आपल्या निकटच्या सहकार्यांसमवेत गुरुवारी भोजन बैठक आयोजित करून एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे पंजाब कॉंग्रेसमधील आपल्या जवळच्या नेत्यांना भोजनास आमंत्रित करून शक्तिप्रदर्शन करण्यात अमरिंदरसिंग यशस्वी...
1 Jul 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, June 22nd, 2021
नवी दिल्ली, २२ जून – पंजाबमध्ये पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार शीख असेल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकतेच जाहीर केले. केजरीवाल यांचा इशारा कॉंग्रेसमध्ये नाराज असलेले नवज्योतसिंग सिद्धू यांच्याकडे असल्याचे मानले जात आहे. सिद्धू आपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या शक्यतेचे केजरीवाल यांनी खंडन देखील केलेले नाही. पंजाबमध्ये पुढच्या वर्षी मार्चमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यातच मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात दररोज संघर्ष...
22 Jun 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, June 14th, 2021
पंजाब उच्च न्यायालयाचा निर्वाळा, चंदीगढ, १४ जून – काही दिवस एकत्र राहणे म्हणजे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ असल्याचे कायदेशीररीत्या मानले जाणार नाही, असा निर्वाळा पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. २० वर्षीय मुलगा आणि १४ वर्षीय मुलीने या संदर्भात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ती फेटाळून लावली. आम्ही लिव्ह-इन रिलेशनमध्ये असून, आपल्याला सुरक्षेची गरज आहे. नातेवाईकही आमच्यावर वेगळे होण्यासाठी दबाव आणत आहेत, असे या प्रकरणातील मुलीने न्यायालयाला सांगितले. लिव्ह-इन...
14 Jun 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, June 13th, 2021
विधानसभा निवडणुकीसाठी ९७-२० जागांचे सूत्र, चंदीगढ, १२ जून – पुढील वर्षी पंजाबमध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीसाठी शिरोमणी अकाली दल आणि बसपाने आज शनिवारी आघाडी केली आहे. पंजाब विधानसभेच्या ११७ जागांपैकी २० जागा बसपा लढणार आहे, तर ९७ जागा शिरोमणी अकाली दल लढवेल, अशी माहिती अकाली दलाचे अध्यक्ष सुखबिरसिंग बादल यांनी पत्रपरिषदेत दिली. पंजाबच्या राजकारणात हा एक नवा अध्याय आहे, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पंजाबमधील सर्वांत मोठा पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली...
13 Jun 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, May 19th, 2021
नवज्योतसिंग सिद्धू यांचा आरोप, चंदीगढ, १९ मे – पंजाब कॉंग्रेसमधील गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे. राज्याचे माजी मंत्री आणि कॉंग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यावर निशाणा साधला आहे. खरे बोलल्यामुळे पक्षातील सहकार्यांना धमकावले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचे राजकीय सल्लागार संदीप संधू यांनी धमकावल्याचा आरोप कॉंग्रेस आमदार परगटसिंग यांनी केला आहे. या पृष्ठभूमीवर सिद्धू यांनी हे वक्तव्य केले. धार्मिक ग्रंथाच्या अवमाननेच्या घटनेवरून राज्य सरकारला...
19 May 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, May 18th, 2021
पंजाबमध्ये पुन्हा वाद पेटला, अमृतसर, १८ मे – पंजाबमधील विधानसभा निवडणूक एक वर्षावर आली असतानाच गटातटांनी विभागलेल्या पंजाब कॉंग्रेसमध्ये तीव्र मतभेद उफाळून आले आहेत. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय नवज्योतसिंग सिद्धू यांना उपमुख्यमंत्रिपद हवे आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे आता पंजाबमध्ये वाद पेटला आहे. एकीकडे कॉंग्रेसकडून मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील मतभेद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यांच्यातील वाद दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत आहे. दोन्ही नेत्यांमधील वाद असाच सुरू राहिला,...
18 May 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, April 28th, 2021
अमरिंदरसिंग यांचे सिद्धूंना आव्हान, चंदीगड, २८ एप्रिल – पतियाळा मतदारसंघातून माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवा, असे थेट आव्हान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी माजी मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांना दिले आहे. पक्षात बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी सिद्धूंना ठणकावून सांगितले. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. नवज्योतसिंग सिद्धूंना माझ्याविरोधात निवडणूक लढवायची असेल तर ते स्वतंत्र आहेत. त्यांचे नशीबही जनरल जे. जे. सिंग यांच्यासारखे होईल. जनरल सिंग यांनी शिरोमणी अकाली...
28 Apr 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, March 20th, 2021
हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी ठणकावले, चंदीगढ, २० मार्च – कुणीही यावे आणि बस्तान मांडावे, यासाठी भारत देश ही काही धर्मशाळा नाही, अशा शब्दांत हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी जोरदार ठणकावले आहे. हरयाणात आलेल्या रोहिंग्यांबाबत माहिती घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील काही दिवसांपासून देशात रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्न चर्चेत आहे. रोहिंग्यांनी जम्मू, हैदराबाद, उत्तरप्रदेश, राजस्थान आणि दिल्लीमध्ये आश्रय घेतल्याचे आढळून आले आहे. जम्मूमध्ये अनधिकृतरीत्या वास्तव्य करणार्या १६८ रोहिंग्यांना तुरुंगात...
20 Mar 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, March 11th, 2021
चंदीगढ, १० मार्च – केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला शस्त्र बनवून कॉंगे्रसने आज बुधवारी हरयाणातील मनोहरलाल खट्टर सरकारविरोधात विधानसभेत दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला. प्रस्तावाच्या बाजूने ३२ आणि विरोधात ५५ मते मिळाली. यामुळे कॉंगे्रस पक्ष पुन्हा तोंडघशी पडला आहे. प्रस्तावावर सुमारे सहा तास चर्चा झाल्यानंतर मतविभाजन करण्याची मागणी कॉंगे्रसने केली. यानंतर विधानसभा अध्यक्ष ग्यानचंद गुप्ता यांनी निकाल जाहीर केला आणि प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचे सांगितले. अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात...
11 Mar 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, January 28th, 2021
चंदीगड, २७ जानेवारी – दिल्लीत झालेला हिंसाचार विशेषतः लाल किल्ल्यावर आंदोलकांनी घातलेला धुडघूस निंदनीय आहे. या घटनेमुळे देशाचा अपमान झाला. मान शरमेने खाली गेली, अशी संतप्त प्रतिक्रिया पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारचे कृषी कायदे चुकीचे असून, देशातील संघीय व्यवस्थेच्या विरोधातील आहे. आपण आंदोलक शेतकर्यांसोबत आहोत, पण आंदोलकांच्या या कृतीमुळे शेतकरी आंदोलन कमकुवत होईल. लाल किल्ला स्वतंत्र भारताचे प्रतीक आहे. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावा, यासाठी स्वातंत्र्य...
28 Jan 2021 / No Comment / Read More »