किमान तापमान : 25.94° से.
कमाल तापमान : 25.97° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 2.21 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.97° से.
24.63°से. - 28.37°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.76°से. - 28.47°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.34°से. - 28.03°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल25.31°से. - 28.21°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.65°से. - 28.61°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.3°से. - 28.9°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादलएकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न,
चंदीगड, १ जुलै – एकीकडे दिल्लीत प्रियांका वढेरा व राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर पंजाबमधील पेचप्रसंगावर हायकमांडच्या तोडग्याची वाट पाहणार्या असंतुष्ट नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पुन्हा एकदा कुरघोडी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी चंदीगडमध्ये आपल्या निकटच्या सहकार्यांसमवेत गुरुवारी भोजन बैठक आयोजित करून एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे.
एकीकडे पंजाब कॉंग्रेसमधील आपल्या जवळच्या नेत्यांना भोजनास आमंत्रित करून शक्तिप्रदर्शन करण्यात अमरिंदरसिंग यशस्वी ठरले आहेत, तर दुसरीकडे नवज्योतसिंग सिद्धूंबाबत हायकमांडने जो तोडगा काढला आहे, त्याला पंजाब कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांची मान्यता राहील, हे दर्शविण्यातही मुख्यमंत्री यशस्वी झाले आहेत.
५ खासदार, २० आमदार व ८ मंत्री उपस्थित
कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी गुरुवारी बोलाविलेल्या भोजन बैठकीस पक्षाचे पाच खासदार, २० आमदार, ८ कॅबिनेट मंत्री, ३० जिल्हाध्यक्षांसह अनेक मोठे नेते उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पंजाब कॉंग्रेसमधील कलहावर काढण्यात आलेल्या तोडग्यासंदर्भात आपल्या जवळच्या नेत्यांशी चर्चा केली. जर कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याच नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक लढविण्यात आल्यास नवज्योतसिंग सिद्धू यांना कॉंग्रेस हायकमांड जे पद सोपवेल त्याचे पंजाब कॉंग्रेसचे सर्व नेते स्वागत करतील, असेही या बैठकीत ठरले.
मात्र, बैठकीत सहभागी नेत्यांनी शहर विकासासंदर्भात चर्चा करण्यासाठी गेलो असल्याचे माध्यमांना सांगितले. या बैठकीत नवज्योतसिंग सिद्धू प्रकरणी कुठलीही चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, यापूर्वी सिद्धूंविषयी आक्रमक भाषा वापरणारे पंजाब कॉंग्रेसचे नेते आता मवाळ भूमिका घेत आहेत. कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याप्रमाणेच सिद्धू हे देखील महत्त्वाचे व प्रभावी नेते असल्याचे काही नेत्यांनी सांगितले.