किमान तापमान : 26.05° से.
कमाल तापमान : 26.17° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 54 %
वायू वेग : 2.54 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.05° से.
25.99°से. - 28.66°से.
बुधवार, 19 फेब्रुवारी25.62°से. - 28.89°से.
गुरुवार, 20 फेब्रुवारी26.23°से. - 30.31°से.
शुक्रवार, 21 फेब्रुवारी26.47°से. - 29.59°से.
शनिवार, 22 फेब्रुवारी26.55°से. - 29.52°से.
रविवार, 23 फेब्रुवारी26.48°से. - 29.5°से.
सोमवार, 24 फेब्रुवारीदिलबागसिंग यांची माहिती,
श्रीनगर, २९ जून – जम्मूतील वायुतळावर ड्रोनच्या माध्यमातून झालेल्या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचा हात असल्याचे प्रारंभिक तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबागसिंग यांनी आज मंगळवारी दिली.
वायुतळाच्या उच्च सुरक्षा क्षेत्रात रविवारी ड्रोनद्वारे घडवून आणलेले दोन स्फोट हे दहशतवादी हल्लाच होते, असे त्यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. रविवारी सकाळच्या सुमारास जम्मू येथील उच्च सुरक्षा व्यवस्था असलेल्या वायुतळाच्या तांत्रिक परिसरात पाच मिनिटांच्या अंतराने दोन स्फोट घडवून आणले गेले होते. यातील दुसरा स्फोट मैदानात झाला होता. अंधारामध्ये हल्ला घडवून आणण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. कमी उंचीवरून उड्डाण करणार्या या ड्रोनच्या माध्यमातून वायुतळावर स्फोटके टाकण्यात आली. अशा प्रकारचा हा पहिलाच हल्ला आहे.
वायुतळाच्या सीमेवरील भिंतींवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांतील फुटेजची पाहणी करण्यात आली आहे. मात्र, या ड्रोनचा उड्डाण मार्ग अद्याप शोधून काढण्यात आलेला नाही. स्फोटके टाकल्यानंतर दोन्ही ड्रोन एकतर सीमेच्या पलीकडे किंवा दुसर्या ठिकाणी गेली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एनआयएने सोमवारी येथील पुरावे शोधले. या स्फोटानंतर जम्मू-काश्मिरातील सर्वच महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षा वाढवण्यात आली, अशी माहिती अधिकार्यांनी दिली.