किमान तापमान : 28.22° से.
कमाल तापमान : 29.4° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 39 %
वायू वेग : 2.56 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.4° से.
23.86°से. - 29.99°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.33°से. - 27.74°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल24.61°से. - 28.54°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.91°से. - 28.49°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर कुछ बादल25.02°से. - 28.97°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.45°से. - 28.82°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादलड्रोन झाले अतिरेक्यांचे नवे शस्त्र,
श्रीनगर, २८ जून – जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० निष्प्रभ करण्यात आल्यानंतर अतिरेक्यांच्या घुसखोरीला आळा बसला आहे. मोठे हल्लेही पूर्णपणे नियंत्रणात आले. सीमेपलीकडून शस्त्र व स्फोटकांची तस्करी अशक्य झाल्याने, अतिरेक्यांनी आता ड्रोन्सची मदत घेणे सुरू केले आहे. यावरून पाकिस्तानला जोडणारी सीमा आता अतिरेक्यांच्या घुसखोरीसाठी पूर्वीप्रमाणे राहिली नाही, हेच दिसून येते.
भारतीय जवानांची नजर चुकवून घुसखोरी करणे, शस्त्र व स्फोटके नेणे अशक्य झाल्याने अतिरेकी आता ड्रोन्सची मदत घेत आहेत. सुरक्षा दलाच्या जवानांवर छुपे हल्ले करण्यासाठी त्यांनी ड्रोन्सला नवीन शस्त्र म्हणून स्वीकारले आहे, असे संरक्षण सूत्रांनी सांगितले.
कलम ३७० निष्प्रभ केल्यानंतर केंद्र सरकारने सुरक्षा जवानांना संपूर्ण मोकळीक दिली आहे. याचा पुरेपूर फायदा घेत जवानांनी या काळात पाकिस्तानच्या भूमीत सक्रिय असलेल्या विविध दहशतवादी संघटनांच्या बड्या अतिरेक्यांचा खात्मा केला. काही संघटना तर नेतृत्वहिन झाल्या आहेत. अतिरेकी होण्याची ताकद आता स्थानिक तरुणांमध्ये राहिली नाही. अनेक तरुण तर चकमकीच्या काळात शरण येण्यावर भर देतात.
जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबागसिंग यांच्या मते, मागील वर्षी २२५ अतिरेक्यांना ठार करण्यात आले, यात ४६ वरिष्ठ कमांडर्सचा समावेश आहे. तर, आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे. घुसखोरी करून भारतीय हद्दीत पाय ठेवणे म्हणजे मृत्यूचा सामना करणेच होय, हे माहीत झाल्यानंतर अतिरेक्यांनी संरक्षण तळांवर हल्ला करण्यासाठी ड्रोन्सची मदत घेतली आहे.
पाच वर्षांत ९८९ अतिरेक्यांचा सफाया
मागील पाच वर्षांत सुरक्षा दलाच्या जवानांनी ९८९ अतिरेक्यांना विविध चकमकींमध्ये ठार मारले आहे.
वर्ष मेलेले अतिरेकी
२०१६ १४०
२०१७ २१०
२०१८ २५७
२०१९ १५७
२०२० २२५