किमान तापमान : 28.22° से.
कमाल तापमान : 29.4° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 39 %
वायू वेग : 2.56 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.4° से.
23.84°से. - 29.99°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.33°से. - 27.74°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल24.61°से. - 28.54°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.91°से. - 28.49°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर कुछ बादल25.02°से. - 28.97°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.45°से. - 28.82°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादलवायुतळावरील ड्रोन्स हल्ला प्रकरण,
जम्मू, २८ जून – जम्मूतील सतवारी हवाई तळावर रविवारी पहाटे ड्रोन्सच्या माध्यमातून दोन स्फोट करण्यात आले. हवाई तळावर अशा प्रकारचे हल्ले करण्याची पद्धत येमेनमधील हुती बंडखोरांकडून वापरली जाते. हुती बंडखोरांचे ड्रोन्स काही किलोमीटर अंतर कापून सौदी अरबच्या हवाई तळावर हल्ले करतात.
येमेनमध्ये सक्रिय असलेल्या हुती बंडखोरांकडून सौदी अरबच्या हवाई तळावर सातत्याने हल्ले केले जातात. या बंडखोरांना इराणकडून मदत दिली जात असल्याचे म्हटले जाते. हुती बंडखोरांना शस्त्रास्त्रे, ड्रोन्स आणि इतर स्फोटके इराणी सैन्याकडून दिली जातात. त्यांच्याकडे चिनी बनावटीचेही ड्रोन्स आहेत. या ड्रोन्सच्या माध्यमातून २० ते २५ किमीपर्यंतच्या लक्ष्यावर सहजपणे हल्ला केला जातो, असे सूत्रांचे मत आहे.
एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार, हुती बंडखोरांनी स्वत:चा ड्रोन कारखाना उभा केला आहे. सीमेपलीकडून आणि इराणकडून ड्रोन्सच्या निर्मितीसाठी त्यांना साहित्य पुरवले जाते. इराणकडून अभियंते आणि तांत्रिक मदत पुरवली जाते. यामुळे सामान्य वाटणारे ड्रोन घातक शस्त्रांमध्ये बदलण्यात येतात.
मागील वर्षात २६७ ड्रोन्स हल्ले
चीनची वृत्तसंस्था शिन्हुआने हुती मिलिशियाचे लष्करी प्रवक्ते याहया सरायाच्या हवाल्याने म्हटले आहे की, २०२० मध्ये सौदी अरब सैन्याच्या ठिकाणांवर २६७ ड्रोन्स हल्ले करण्यात आले होते. येमेनमध्येच १८० हल्ले झाले होते. सौदीच्या नेतृत्वात काही देशांचे सैन्य हुती बंडखोरांविरोधात लढत आहेत.
२०११ पासून हुती बंडखोरांचे ड्रोन्स हल्ले सुरू आहेत. या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात हुती बंडखोरांनी दक्षिण-पश्चिम सौदी अरबच्या अबहा आंतरराष्ट्रीय विमानतळाला लक्ष्य केले होते. यात एका प्रवासी विमानाला आग लागली होती. सौदी लष्कराने लगेच कारवाई करीत दोन ड्रोन्स हवेतच पाडले होते.
अतिरेकी हल्ल्यात पोलिस अधिकारी हुतात्मा; पत्नी व मुलीचीही केली हत्या
हवाई दलाच्या तळावर ड्रोन्सच्या माध्यमातून स्फोट घडविण्याची घटना ताजी असतानाच, अतिरेक्यांनी रविवारी उशिरा रात्री एका पोलिस अधिकार्याची व त्यांची पत्नी आणि मुलीची घरात घुसून हत्या केली. जम्मूच्या पुलवामा जिल्ह्यात ही घटना घडली.
दोन ते तीन अशा संख्येत असलेल्या विदेशी अतिरेक्यांनी रविवारी रात्री अकराच्या सुमारास हा भ्याड हल्ला केला. घरात घुसताच अतिरेक्यांनी तिघांवरही बेछूट गोळीबार केला. यात फय्याज अहमद असे नाव असलेल्या विशेष पोलिस अधिकार्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी रजा बेगम आणि मुलगी रफिया गंभीर जखमी झाले. या दोघींनाही रुग्णालयात नेले असता, त्यांचाही मृत्यू झाला, अशी माहिती पोलिस प्रवक्त्याने दिली.
या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलाच्या जवानांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आणि व्यापक शोधमोहीम हाती घेतली. मात्र, अद्याप अतिरेक्यांना अटक करण्यात आली नाही.
विविध राजकीय पक्षांकडून निषेध
या हत्याकांडाचा जम्मू-काश्मिरातील विविध राजकीय पक्षांनी तीव्र निषेध केला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून, ही घटना निंदनीय असल्याचे म्हटले आहे, तर पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी, अतिरेक्यांना लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. पीपल्स कॉन्फरन्सचे नेते सज्जाद लोन यांनीही या घटनेचा निषेध केला, तर भाजपाने अतिरेक्यांना शोधून ठार मारण्याची मागणी केली आहे.