किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.37° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 2.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.99°से. - 28.89°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.8°से. - 28.3°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर घनघोर बादल24.7°से. - 28.55°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.02°से. - 28.98°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.35°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.29°से. - 29.02°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादलआज घेणार शपथ,
डेहराडून, ३ जुलै – तीरथसिह रावत यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपाचे वरिष्ठ नेते पुष्करसिंह धामी यांची आज शनिवारी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकमताने निवड करण्यात आली. उद्या रविवारी ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
प्रदेश भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आज झालेल्या बैठकीत ४५ वर्षीय पुष्करसिंह धामी यांची निवड करण्यात आली. तीरथसिंह रावत यांनीच बैठकीत त्यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला आणि इतर आमदारांनी त्यास अनुमोदन दिले, अशी माहिती बैठकीत केंद्रीय निरीक्षक म्हणून उपस्थित असलेले नरेंद्रसिंह तोमर यांनी पत्रकारांना दिली. तीरथसिंह रावत यांनी शुक्रवारी उशिरा रात्री पदाचा राजीनामा दिला होता. चार महिन्यांपूर्वीच त्यांनी त्रिवेंद्रसिंह रावत यांच्याकडून मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली होती. मात्र, ते विधानसभेचे सदस्य नसल्याने आणि कोरोनाच्या संकटामुळे नजीकच्या भविष्यात रिक्त दोन जागांसाठी पोटनिवडणूक घेणे शक्य नसल्याने तीरथसिंह यांना घटनात्मक दायित्वानुसार राजीनामा द्यावा लागला. पुष्करसिंह रावत उद्या रविवारी राजभवनात आयोजित साध्या समारंभात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी पत्रकारांना दिली. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची भाजपाने मुख्यमंत्रिपदी निवड केली. सर्वांच्या सहकार्याने मी जनतेच्या समस्या सोडविण्यावर भर देणार आहे.
… तर ममतांनाही राजीनामा द्यावा लागेल
तीरथसिंह रावत यांचा राजीनामा हा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे. राज्यघटनेच्या कलम १६४-अ नुसार, विधिमंडळाचा सदस्य नसलेल्या कोणत्याही मुख्यमंत्र्याने सहा महिन्यांच्या आत विधिमंडळाचसदस्य होणे अपेक्षित आहे. सहा महिन्यांत कोणत्याही सभागृहाचे सदस्य होता आले नाही तर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. आता पश्चिम बंगालमध्ये देखील अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. कारण, ममता बॅनर्जी देखील अशाच स्थितीत अडकल्या आहेत.